कर्नाटकात काँग्रेसचे २ आमदार भाजपच्या गळास लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 04:15 AM2019-05-27T04:15:00+5:302019-05-27T04:15:32+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर कर्नाटक आणि मध्य प्रदेशात राजकीय उलथापालथ सुरुच आहे.

Two Congress MLAs in Karnataka want BJP to lose? | कर्नाटकात काँग्रेसचे २ आमदार भाजपच्या गळास लागणार?

कर्नाटकात काँग्रेसचे २ आमदार भाजपच्या गळास लागणार?

Next

बेंगळूरु : लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर कर्नाटक आणि मध्य प्रदेशात राजकीय उलथापालथ सुरुच आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या एस. एम. कृष्णा यांची काँग्रेसच्या दोन आमदारांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट औपचारिक असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र लोकसभा निवडणुकीतही कॉँग्रेसचे आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला होता.
कॉँग्रेसचे रमेश जरकिहोली आणि डॉक्टर सुधाकर हे आमदार कृष्णा यांना भेटले. भाजपचे नेते आर. अशोक सुध्दा उपस्थित होते. जरकिहोली यांनी या मुलाखतीबद्दल खुलासा करताना सांगितले की, ही राजकीय भेट नव्हती. आम्ही केवळ कृष्णा यांना भेटण्यासाठी आलो होतो. भाजपने कर्नाटकात २५ जागांवर विजय मिळविल्याने त्यांचे अभिनंदन केले. ही केवळ औपचारिक भेट होती.
आर.अशोक यांनीही या भेटीला कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, मी एस. एम. कृष्णा यांच्याशी आमच्या पक्षाशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी आलो होतो. रमेश जरकिहोली आणि डॉक्टर सुधाकर यांच्याशी माझी मैत्री नाही. कर्नाटक मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, मात्र सरकार जेडीएस आणि कॉँग्रेसने एकत्र बनविले आहे. हे सरकार उलथवून लावण्यासाठी आॅपरेशन लोटस सुरू करण्यात आलेचे बोलले जात होते.
>राजकीय नाट्य येणार आणखी रंगात
कर्नाटक मध्ये राज्य सरकारची स्थापना करण्याची भाजपची संधी हुकली. पण, लोकसभेच्या २८ पैकी २५ जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे भाजप संपूर्ण जोषात आहे. दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे सुध्दा निवडणूक हारले. माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा यांचाही दारुण पराभव झाला. तेव्हापासू कर्नाटक मध्ये सरकार स्थापनेनंतर राजकीय नाट्य सुरुच आहे. ते येत्या काळात रंगात येऊ शकते.

Web Title: Two Congress MLAs in Karnataka want BJP to lose?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.