अश्रुधूर सेल फुटल्याने दोन पोलीस जखमी पोलीस कवायत मैदानावरील घटना : महानिरीक्षकांच्या दौर्यानिमित्त सुरू आहे प्रात्यक्षिक
By admin | Published: March 5, 2016 11:49 PM2016-03-05T23:49:05+5:302016-03-05T23:49:05+5:30
जळगाव: पोलीस कवायत मैदानावर सुरू असलेल्या प्रात्यक्षिका दरम्यान अश्रुधूर सेल फुटल्याने राहुल तोलाचंद नारेकर (वय २६) व संभाजी सरोदे (वय २३ ) दोन्ही रा.पोलीस मुख्यालय हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी सात वाजता घडली. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची लगेच सुटका करण्यात आली.
Next
ज गाव: पोलीस कवायत मैदानावर सुरू असलेल्या प्रात्यक्षिका दरम्यान अश्रुधूर सेल फुटल्याने राहुल तोलाचंद नारेकर (वय २६) व संभाजी सरोदे (वय २३ ) दोन्ही रा.पोलीस मुख्यालय हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी सात वाजता घडली. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची लगेच सुटका करण्यात आली.नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विनयकुमार चौबे हे ९ ते १२ या कालावधित पोलीस दलाच्या वार्षिक तपासणी निमित्त जिल्हा दौर्यावर येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर दोन दिवसापासून पोलीस कवायत मैदानावर मॉक ड्रील, सेरेमोनियल यासह विविध प्रकारचे प्रात्यक्षिक सुरू आहे. शनिवारी संध्याकाळी सरावादरम्यान एका कर्मचार्याने अश्रुधूर सेल फेकल्यानंतर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी लांब जाण्याऐवजी राहुल नारेकर त्याला पकडण्यात गेला. त्यावेळी सेलने टप्पा घेतल्यामुळे त्याचा स्फोट झाला. त्यातील वायु बाहेर आला. त्यात घसरुन पडल्यामुळे राहुल यांना हाताला खरचटले तर संभाजी सरोदे यांच्या डोळ्याजवळ दगड लागल्याने जखम झाली. या प्रकारामुळे प्रात्यक्षिक थांबविण्यात आले व दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. प्रात्यक्षिक घेणे ही नियमित प्रक्रीया आहे,अशा सरावामुळे किरकोळ खरचटण्याचे प्रकार घडतात. त्यात घातक असे कोणतेही द्रव्य नसते. आजचा हा प्रकार त्याचाच भाग असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.