आजपासून दोनदिवसीय सार्क शिखर परिषद
By admin | Published: November 26, 2014 02:41 AM2014-11-26T02:41:54+5:302014-11-26T02:41:54+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क परिषदेसाठी नेपाळमध्ये आले असून, प्रादेशिक संघटना असणा:या सार्क मध्ये नवे संजीवन आणणो हा य ाभेटीचा मुख्य उद्देश आहे.
Next
पंतप्रधान नेपाळ दौ:यावर : प्रादेशिक संबंध दृढ करण्यावर राहणार भर
काठमांडू : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क परिषदेसाठी नेपाळमध्ये आले असून, प्रादेशिक संघटना असणा:या सार्क मध्ये नवे संजीवन आणणो हा य ाभेटीचा मुख्य उद्देश आहे. बुधवारपासून दोन दिवस चालणा:या सार्क परिषदेस सुरुवात होत आहे. शेजारी देशांशी चांगले संबंध विकसित करणो हा माङया सरकारचा मुख्य उद्देश आहे असे मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी यांची ही पहिली सार्क परिषद आहे. त्यासाठी नेपाळमध्ये त्यांचे भव्य स्वागत झाले. 26 नोव्हेंबरपासून सुरु होणा:या या परिषदेत मोदी विविध विषयावरील भारताची मते मांडतील. मोदी यांच्या अधिकृत कार्यक्रमात पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटण्याचा कार्यक्रम नाही. अफगाण अध्यक्ष अश्रफ गनी, बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद राजपाक्षे यांना मोदी भेटणार आहेत.
सार्कमध्ये चीनला प्रवेश?
काठमांडू- चीनला सार्क परिषदेत प्रवेश हवा असून, सध्याच्या निरीक्षक पदावरुन सदस्यपदावर येण्याची चीनची इच्छा आहे. त्यासाठी नेपाळ चीनला मदत करणार असून, चीनची ही इच्छा सर्व सदस्य राष्ट्रांना सांगण्याची तयारी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी दर्शविली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी आज काठमांडू- नवी दिल्ली बससेवेला हिरवा ङोंडा दाखविला. पशुपतीनाथ एक्सप्रेस असे या बससेवेचे नाव आहे. बसला हिरवा ङोंडा दाखविण्याआधी दोन्ही पंतप्रधानांनी बसमधील प्रवाशांशी चर्चा केली. (वृत्तसंस्था)