राज्यसभेत आजपासून दोन दिवसीय विशेष चर्चा, 'वन नेशन, वन इलेक्शन'चे विधेयक लोकसभेत स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 07:56 IST2024-12-16T07:54:36+5:302024-12-16T07:56:11+5:30
लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या सुधारित कार्यसूचीमध्ये दोन्ही विधेयके सोमवारच्या कार्यसूचीमध्ये समाविष्ट नाहीत. सरकार लोकसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने पूरक अजेंडाद्वारे शेवटच्या क्षणी देखील अजेंडा जोडू शकते.

राज्यसभेत आजपासून दोन दिवसीय विशेष चर्चा, 'वन नेशन, वन इलेक्शन'चे विधेयक लोकसभेत स्थगित
राज्यसभेत हिवाळी अधिवेशनाच्या १६ व्या दिवशी सोमवारी राज्यसभेत दोन दिवसीय विशेष चर्चेला सुरुवात होणार आहे. गृहमंत्री अमित शहा सभागृहात याची सुरुवात करू शकतात. विरोधी पक्षाकडून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जू खरगे चर्चेला सुरुवात करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी चर्चेत भाग घेणार आहेत. त्याचबरोबर 'वन नेशन, वन इलेक्शन' संबंधित विधेयके लोकसभेत मांडण्याचे काम आर्थिक कामकाज पूर्ण होईपर्यंत सरकारने पुढे ढकलले आहे. याआधी संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे विधेयक सोमवारी लोकसभेत सादर करण्यात आले.
मंत्रिमंडळात ४ लाडक्या बहिणींना स्थान; ३ भाजप, १ अजित पवार गट, शिंदेंकडून महिलांना संधी नाही
सोमवारी सूचीबद्ध केलेल्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांची पहिली फेरी सभागृहाने मंजूर केल्यानंतर ही विधेयके सादर केले जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या सुधारित अजेंड्यात दोन्ही विधेयके सोमवारच्या अजेंड्यात समाविष्ट नाहीत. सरकार लोकसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने पूरक अजेंडाद्वारे शेवटच्या क्षणी देखील विधानसभेचा अजेंडा जोडू शकते.
कार्यपद्धतीच्या नियमांनुसार, 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या अंमलबजावणी संबंधित दोन्ही विधेयकांच्या प्रती गेल्या आठवड्यातच लोकसभा सदस्यांमध्ये वितरित करण्यात आल्या. विशेष म्हणजे संसदेचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरला संपणार आहे.