निकालाच्या दोन दिवसआधी अमित शाह यांची 'एनडीए'च्या नेत्यांसोबत 'डीनर पार्टी'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 10:28 AM2019-05-21T10:28:18+5:302019-05-21T10:33:12+5:30
या बैठकीपूर्वी ४ वाजता भाजप मुख्यालयात मंत्री परिषदेच्या सदस्यांसमवेत पीएम मोदी आणि अमित शाह बैठक घेणार आहेत. एनडीएमध्ये भाजपनंतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. २०१४ मध्ये शिवसेनेने भाजपसोबत मिळून १८ जागांवर विजय मिळवला होता.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीएच्या नेत्यांची बैठक बोलवली. बैठकीनंतर डीनर पार्टी होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत.
ही बैठक संध्याकाळी ७ वाजता अशोका हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. यावेळी सर्वांना डीनर देण्यात येणार असून बैठकीला २९ नेत्यांना बोलविण्यात आले आहे. या बैठकीपूर्वी ४ वाजता भाजप मुख्यालयात मंत्री परिषदेच्या सदस्यांसमवेत पीएम मोदी आणि अमित शाह बैठक घेणार आहेत. एनडीएमध्ये भाजपनंतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. २०१४ मध्ये शिवसेनेने भाजपसोबत मिळून १८ जागांवर विजय मिळवला होता.
२०१४ एआयएडीएमके ३६ जागांवर विजय मिळवला आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष एआयएडीएमके, पीएमके, डीएमडीके सोबत लढवत आहे. अनुप्रिया पटेल यांचा अपना दल पक्ष उत्तर प्रदेशात दोन जागांवर निवडणूक लढवत आहे. तर प्रफुल्ल महंत यांचा असम गण परिषद पक्ष भाजपमध्ये सामील झाला आहे. एक्झिट पोलनंतर भाजपने डीनरचा प्लॅन केला आहे. रविवारी जाहीर झालेल्या एक्झिटपोलमध्ये बहुतांशी संस्थांनी भाजपला बहुमत दाखवले आहे.