अध्यक्षांच्या शिफारसीच्या दोन फायली अडकविल्या
By Admin | Published: March 22, 2016 12:41 AM2016-03-22T00:41:36+5:302016-03-22T00:41:36+5:30
जळगाव- जि.प. अध्यक्ष प्रयाग कोळी यांनी आपल्या शहापूर तळेगाव गटातील शेळगाव व देऊळगाव येथे विविध कामांसाठी शिफारस करून दिलेल्या फायली निर्णयाविना वित्त विभागात पडून राहील्या.
ज गाव- जि.प. अध्यक्ष प्रयाग कोळी यांनी आपल्या शहापूर तळेगाव गटातील शेळगाव व देऊळगाव येथे विविध कामांसाठी शिफारस करून दिलेल्या फायली निर्णयाविना वित्त विभागात पडून राहील्या. त्यात सोमवारी मंजुरीविनाच वित्त विभागाने अध्यक्षांकडे पाठविल्या. मागेही असाच प्रकार झाला होता... शेवटी वित्त विभागात काय सुरू आहे याची विचारणा करण्यासाठी अध्यक्ष कोळी यांनी सायंकाळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळुंके यांना आपल्या दालनात बोलावले. त्यावर ही चूक विभागांतर्गत असल्याचे समोर आले. कनिष्ठ अधिकारी व्यवस्थितपणे फायली सादर करीत नाहीत, तांत्रिक चुका असल्या तर बिले काढताना अडचण निर्माण होते, असे स्पष्टीकरण सोळुंके यांनी दिले. पण एवढे दिवस फायली का प्रलंबित ठेवल्या जातात... आता मार्च अखेर असताना निधी खर्च होत नाही... फायली परत पाठवून विनाकारण त्रास देण्याचा प्रकार योग्य नाही..., अशी नाराजी अध्यक्ष कोळी यांनी व्यक्त केली. अध्यक्ष कोळी यांनी देऊळगाव येथे गावाच्या दर्शनी भागात प्रवेशद्वार निर्मिती व शेळगाव येथे मुरूम टाकण्यासंबंधीच्या कामांना शिफारस दिली होती. त्याबाबत संबंधित गावांचे पदाधिकारी जि.प.त चकरा मारून हैराण झाले होते. या वृत्तास अध्यक्ष कोळी यांनी दुजोरा दिला. तर फायली परत पाठविण्यामागे वित्त विभागातील वरिष्ठ अधिकार्यांमधील अंतर्गत कलह कारणीभूत असल्याचेही सांगण्यात आले.