ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या 2 मुली पडल्या प्रेमात; घेतल्या सप्तपदी अन् अचानक झाल्या गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 05:23 PM2023-03-05T17:23:55+5:302023-03-05T17:26:08+5:30
अनिशा नवरा तर पायल नवरी बनली. त्याच वेळी, संपूर्ण ऑर्केस्ट्रा टीम लग्नाला पोहोचली आणि दोघींनाही लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.
बिहारमध्येही आजकाल समलैंगिक प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. समस्तीपूरनंतर आता बक्सरमध्ये दोन मुलींनी एकमेकांशी लग्न केले आहे. जिल्ह्यातील डुमरावमध्ये हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याची जोरदार चर्चा होत आहे. जिल्ह्यात प्रथमच दोन मुलींनी एकमेकांशी लग्न केले आहे. डुमरावांचे प्रसिद्ध डुमरेजानी मंदिर त्याचे साक्षीदार ठरले. जिथे मंदिराच्या परिसरात समलिंगी विवाह झाला. दोन्ही मुली ऑर्केस्ट्रा पार्टीमध्ये डान्सर म्हणून काम करतात, असे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघीही गेल्या तीन वर्षांपासून कोरानसराय आथर यांच्या ऑर्केस्ट्रा पार्टीमध्ये डान्सर म्हणून काम करत होत्या. याच दरम्यान दोघींमध्ये जवळीक वाढली आणि एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न होण्यापूर्वी डुमराव उपविभागीय न्यायालयात पोहोचून त्यांचा विवाह कायदेशीररित्या वैध ठरविला. त्यानंतर बांके बिहारी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. डुमरेजानी मंदिरात पोहोचल्यानंतर लग्न केलं. यादरम्यान अनिशा नवरा तर पायल नवरी बनली. त्याच वेळी, संपूर्ण ऑर्केस्ट्रा टीम लग्नाला पोहोचली आणि दोघींनाही लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.
अनिशा कुमारीचे वडील उमेश सरदार आहेत. जे बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंजचे रहिवासी आहे. तर पायल ही अररिया जिल्ह्यातील जयनगर गावातील फेकू सरदार यांची मुलगी आहे. समलैंगिक विवाह स्वतःच्या इच्छेने केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे या बातमीबाबत सर्व प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे लोक सांगत आहेत. ज्यामध्ये दोन मुली विवाहित आहेत. यानंतर दोघीही गायब झाल्या आहेत.
दोन्ही मुलींच्या समलैंगिक विवाहाबाबत माहिती देताना ऑर्केस्ट्राचे संचालक लालजी यांनी सांगितले की, अनिशा आणि पायल या दोघी त्यांच्याकडे काम करत होत्या. दरम्यान, दोघींमधील प्रेम वाढतच गेले. लग्न केले. अनिशाच्या घरच्यांनी या लग्नाला होकार दिला आहे, मात्र पायलने हा निर्णय तिच्या घरच्यांच्या विरोधात घेतला आहे. दुसरीकडे, पती बनलेल्या अनिशाचा असा विश्वास आहे की लहानपणापासूनच तिचा कल पुरुषांकडे नसून मुलींकडे आहे. दरम्यान, ऑर्केस्ट्रामध्ये तीन वर्षे एकत्र काम करत असताना पायलसोबतची मैत्री घट्ट झाली आणि तिने तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"