क्रिकेट खेळण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी
By admin | Published: November 29, 2015 11:55 PM2015-11-29T23:55:07+5:302015-11-29T23:55:07+5:30
रामेश्वर कॉलनीतील घटना : चार जण जखमी; एकावर चाकु हल्ला
Next
र मेश्वर कॉलनीतील घटना : चार जण जखमी; एकावर चाकु हल्लाजळगाव : क्रिकेट खेळण्याच्या कारणावरुन रामेश्वर कॉलनीत रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता दोन गटात हाणामारी झाली. यात दगड व चाकूचा वापर करण्यात आला. उमेश संजय गजरे (वय १९), मयुर सुनील वाणी (वय १८) गोपाळ देविदास मगर (वय ३५) सर्व रा.रामेश्वर कॉलनी व संजय सुरेश मराठे (वय २० रा.वाघ नगर) हे चार जण जखमी झाले आहेत. रामेश्वर कॉलनी व रुग्णालयात तणावदोन गटातील तरुणांमध्ये वाद होवून दगडफेक व चाकू हल्ला झाल्याने रामेश्वर कॉलनीत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही गटातील सुमारे शंभर जणांचा जमाव जमला होता. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील कुराडे व सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांनी अतिरिक्त कुमक घेवून घटनास्थळ गाठले. तोपर्यंत जखमींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. पोलिसांनी वादावर नियंत्रण मिळविल्यानंतर हा जमाव पटेल दवाखान्याजवळ जमला. येथेही पोलिसांनी गर्दी पांगविली नंतर वादग्रस्त प्रकरण असल्याने डॉक्टरांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठविले. या जखमींना जिल्हा रुग्णालयात आणल्याचे समजताच शंभराच्यावर तरुणांनी तिकडे धाव घेतली. दोन्हीकडील तरुण एकमेकाच्या अंगावर धावून गेले होते. त्यामुळे तणाव अधिक वाढला होता. निरीक्षक कुराडे, धारबळे हे देखील ताफ्यासह तातडीने रुग्णालयात पोहचले. त्यापाठोपाठ नगरसेवक सुमित्रा सोनवणे यांचा मुलगा भूषण सोनवणे व अशोक लाडवंजारी दाखल झाले. तोपर्यंत वाद घालणारे तेथून पसार झाले होते.मयुरला खासगी हलविले मयुर याच्या पोटावर चाकुने वार झाल्याने भूषण सोनवणे व सहकार्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविले. दोन्ही गटाचे चार तरुण जखमी असले तरी या हल्लयात आणखी कोणाचा समावेश होता.कोणी कोणावर हल्ला केला याबाबत जखमीही सांगायला तयार नसल्याने गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांचीही गोची झाली होती. त्यामुळे जखमींच्या जबाबानुसार दोन्ही गटाच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.