दोन तासांनंतर राहुल गांधींची सुटका
By admin | Published: November 3, 2016 08:10 PM2016-11-03T20:10:21+5:302016-11-03T21:32:02+5:30
वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावर निवृत्त सैनिक राम किशन गरेवाल यांच्या आत्महत्येवर राजकारण सुरूच आहे. कॉंग्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावर निवृत्त सैनिक राम किशन गरेवाल यांच्या आत्महत्येवर राजकारण सुरूच आहे. कॉंग्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज संध्याकाळी पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलं होतं. जवळपास दोन तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे.
दिल्लीच्या जंतर मंतर येथे वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावर निवृत्त सैनिक राम किशन गरेवाल यांच्या आत्महत्येविरोधात कॅंडल लाईट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. या मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी राहुल जात असताना मार्चमध्ये सहभागी होण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यांना ताब्यात घेतलं. कॉंग्रेसकडून जंतर-मंतर पासून इंडिया गेटपर्यंत या मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं.