दोन तासांची पूजा, पंतप्रधान मोदींचे भाषण... प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नियोजन जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 07:38 PM2024-01-07T19:38:31+5:302024-01-07T19:39:48+5:30
२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे, तयारी अंतिम टप्प्यात आली असून अयोध्येतील लोकांमध्ये उत्साह असून संपूर्ण अयोध्या विशेष सजवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत दिवसभर काय कार्यक्रम असणार याची चर्चा सुरू आहे. आता याची माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे.
जेडीयूनंतर आता AAP ने दिला INDIA आघाडीला झटका, लोकसभेसाठी जाहीर केला उमेदवार
त्यांनी मंदिराच्या बांधकामाची पाहणी करून आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. यासोबतच नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त पीएम मोदी सभेला संबोधित करतील, तसेच त्यादरम्यान श्रीरामाच्या प्रतिमेला पवित्र स्नान घालण्यात येईल.
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी रविवारी सांगितले की, पंतप्रधान मोदी श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त जाहीर सभेला संबोधित करतील. मंदिरासमोरील मोकळ्या व्यासपीठावर मध्यवर्ती शिखर व दोन बाजूचे शिखर आणि खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. ६००० खुर्च्या बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पीएम मोदी श्रीरामाच्या मूर्तीचे नेत्र आवरण उघडतील आणि राम मूर्तीला पाण्याने स्नान घालण्यात येईल. नवीन मूर्ती पाहण्यासाठी लोक केवळ उत्सुक आहेत. नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, जुनी रामललाची मूर्ती नवीन रामललाच्या मूर्तीसमोर ठेवली जाईल आणि त्याला उत्सव राम म्हटले जाईल. १६ तारखेनंतर दोन्ही मूर्ती एक-दोन दिवसांत नवीन राम मंदिरात ठेवल्या जातील, कारण रामललाच्या जुन्या मूर्तीच्या दर्शनासाठी आजही भाविक येत आहेत.