दोनशेची नोट येणार; प्रिटींगला झाली सुरुवात
By admin | Published: June 29, 2017 01:30 AM2017-06-29T01:30:18+5:302017-06-29T01:30:18+5:30
नोटाबंदीपासून बाजारात सुरू झालेल्या चलन तुटवडा आणि पाचशे व दोन हजाराच्या नव्या नोटेनंतर सुट्या नोटांची भासू लागलेली चणचण
मुंबई/कोलकाता : नोटाबंदीपासून बाजारात सुरू झालेल्या चलन तुटवडा आणि पाचशे व दोन हजाराच्या नव्या नोटेनंतर सुट्या नोटांची भासू लागलेली चणचण दूर करण्यासाठी आता दोनशे रुपयाची नोट चलनात येणार आहे. या नव्या नोटेची छपाई सुरू करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने काही दिवसांपूर्वी २०० च्या नोटा छापण्यास मंजुरी दिल्याची सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने दिले आहे. रिझर्व्ह बँकेकडून मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. सध्या शंभर रुपये, पाचशे रुपये आणि थेट दोन हजार रुपये अशा मोठे मूल्याच्या असलेल्या नोटा चलनात आहेत. (वृत्तसंस्था)
सुट्या पैशांची चणचण दूर होणार-
बाजारातील सुट्या पैशांची चणचण दूर करण्यासाठी शंभर रुपयांसारखीच दोनशे रुपयांची नोट बाजारात येणार आहे.
पाचशे आणि दोन हजारच्या नव्या नोटांचा रंग आणि डिझाइन आतापर्यंतच्या सर्व नोटांपेक्षा वेगळा होता. दोनशेच्या नोटेचा रंग आणि डिझाइन कसे असेल, हे मात्र अद्याप कळू शकलेल नाही.