दोनशे राजकीय पक्ष कागदोपत्री

By admin | Published: December 22, 2016 01:05 AM2016-12-22T01:05:16+5:302016-12-22T01:05:16+5:30

कागदोपत्री असलेल्या दोनशे राजकीय पक्षांच्या निधीबाबत चौकशी करावी, यासाठी निवडणूक आयोग प्राप्तिकर विभागाला लेखी

Two hundred political parties documentary | दोनशे राजकीय पक्ष कागदोपत्री

दोनशे राजकीय पक्ष कागदोपत्री

Next

नवी दिल्ली : कागदोपत्री असलेल्या दोनशे राजकीय पक्षांच्या निधीबाबत चौकशी करावी, यासाठी निवडणूक आयोग प्राप्तिकर विभागाला लेखी पत्र देणार आहे. काळा पैसा पांढरा करण्यास तर हे राजकीय पक्ष स्थापन करण्यात आले नाहीत? त्यासाठी वापर केला जात नाही ना? असा संशय आयोगाला वाटतो. निवडणूक न लढविणाऱ्या दोनशेहून अधिक पक्षांना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या यादीतून वगळले आहे.
यापैकी बव्हंशी राजकीय पक्ष कागदोपत्रीच असून, लोकांकडून काळ्या पैशात देणगी घेऊन पांढरा करण्यासाठी हे पक्ष मदत करीत असावेत, असा निवडणूक आयोगाला संशय आहे. २००५ पासून निवडणूक न लढविणाऱ्या अशा दोनशेहून अधिक राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या यादीतून वगळले आहे. निव्वळ कागदोपत्री असलेल्या राजकीय पक्षांची यादीच निवडणूक आयोग येत्या काही दिवसांत आयकर विभागाकडे सुपूर्द करणार आहे. जेणेकरून काळा पैसा पांढऱ्या करण्यात हे राजकीय पक्ष आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कायद्यातहत कारवाई केली जावी. निवडणूक आयोगाला असला तरी निवडणूक कायद्यातहत कोणत्याही पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार नाही. हा अधिकार मिळावा, यासाठीचा प्रस्ताव मंत्रालयाकडून प्रलंबित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सात पक्षांना १०२ कोटींची देणगी
भारतातील सात राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांना २०१५-२०१६ वर्षात १०२ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. राजकीय पक्षांना निनावी देणगीदारांकडून २० हजार रुपयांपेक्षा जास्त देणगी घेता येत नाही. सात राजकीय पक्षांना १,७४४ देणगीदारांकडून हे १०२ कोटी मिळाले.
सर्वांपेक्षा तीनपट देणगी भाजपाला
भाजपला ६१३ देणगीदारांकडून जास्तीतजास्त ७६ कोटी रुपये मिळाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाकप, माकप आणि तृणमूल काँग्रेसने जी देणगी मिळाल्याचे जाहीर केले आहे त्याच्या तीनपट देणगी एकट्या भाजपला मिळाली.
राजकीय पक्षांना २० हजार रुपयांपेक्षा जास्तीची देणगी आणि ती देणाऱ्यांची नावे सांगणे बंधनकारक आहे. काँग्रेसला २० कोटी रुपये ९१८ देणगीदारांकडून मिळाले.
एडीआरने २००४ ते २०१५ पर्यंतच्या स्वतंत्रपणे केलेल्या विश्लेषणात राजकीय पक्षांना प्रामुख्याने रोख रकमेत देणगी मिळाल्याचे आढळले. ते प्रमाण ६३ टक्के एवढे होते. त्या तुलनेत २०,००० रुपयांपेक्षा काहीशी जास्त मिळालेली देणगी राजकीय पक्षांनी जाहीर केली आहे. त्यातून हेच दिसते की बहुतेक देणग्या या अज्ञात मार्गांनी मिळतात.
यावर्षी राष्ट्रीय पक्षांच्या एकूण देणगीमध्ये ५२८ कोटी रुपयांची घट झाली. २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात जेवढी देणगी त्यांना मिळाली त्यातुलनेत ही घट ८४ टक्के आहे. २०१४-२०१५ मध्ये राष्ट्रवादीला ३८ कोटी मिळाले होते त्यात तब्बल ९८ टक्क्यांची घट झाली. भाजपला २०१४-२०१५ वर्षात ४३७ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती ती २०१५-२०१६ मध्ये ८२ टक्क्यांनी कमी होऊन ७६ कोटींवर आली.

Web Title: Two hundred political parties documentary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.