मधुमेहावरील भारतातील दोन औषधे धोकादायक
By admin | Published: May 21, 2015 12:42 AM2015-05-21T00:42:44+5:302015-05-21T00:42:44+5:30
मधुमेह टाईप-२ च्या उपचारासाठी नव्याने भारतात आलेली तीनपैकी दोन औषधे धोकादायक असल्याचा इशारा अमेरिकेच्या एफडीए या औषध प्रशासनाने दिला आहे.
नवी दिल्ली : मधुमेह टाईप-२ च्या उपचारासाठी नव्याने भारतात आलेली तीनपैकी दोन औषधे धोकादायक असल्याचा इशारा अमेरिकेच्या एफडीए या औषध प्रशासनाने दिला आहे. या दोन औषधांचा प्रादुर्भाव रक्तातील आम्लाचे प्रमाण वाढण्यात (अॅसिडोसीस) होत असून मधुमेहींना रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागण्याची वेळ येते.
टाईप दोन डायबेटिसवरील कॅनाग्लिफ्लोझिन, डॅपाग्लिफ्लोझिन आणि एम्पाग्लिफ्लोझिन या तीन औषधांमुळे रक्तातील आम्लाची मात्रा वाढण्याचा धोका उद्भवू शकतो, असे अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) म्हटले आहे. ही तिन्ही औषधे एसजीएलटी २ या नव्या श्रेणीत मोडतात. यातील पहिली दोन औषधे भारतीय औषध बाजारात उपलब्ध आहेत.
या औषधांमुळे मूत्रावाटे साखर बाहेर काढली जाते. भारतात कॅनाग्लिफ्लोझिन, डॅपाग्लिफ्लोझिन या दोन औषधांचा वापर सुरू झाला असला तरी त्याचे प्रतिकूल परिणाम नोंदले गेलेले नाहीत.
या औषधांच्या परिणामांसंबंधी डाटा सध्याच मिळविणे घाईचे ठरेल. ही दोन्ही औषधे प्रभावी असल्यामुळे आम्ही ती रुग्णांना देत आहोत, असे भारतीय डॉक्टरांनी म्हटले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
कोट
या दोन औषधांमध्ये मूत्रपिंडाचा वापर होत असताना ते पित्ताशयावर परिणाम कसे करतात हे बघणे आश्चर्यकारक ठरेल. विशेष म्हणजे ते शरीरातील इन्सुलीनच्या प्रमाणावर स्वतंत्ररीत्या कार्य करीत असल्याने ही सकारात्मक बाब ठरते. एफडीएने इशारा दिल्याने आम्ही रुग्णांवर लक्ष ठेवू.
-डॉ. अनुप मिश्रा, एण्डोक्रिनॉलॉजिस्ट तथा र्फोटिज -सीडीओसी या मधुमेह आणि संलग्न विज्ञान संस्थेचे अध्यक्ष
४सध्या टाईप-२ मधुमेहावर अस्तित्वात असलेली औषधे साखर बाहेर काढण्यासाठी मूत्रपिंडाच्या कार्यावर निर्भर राहत नाही. त्यात पित्ताशयाचा वापर केला जातो.
४एफडीएने या औषधांवर अद्याप बंदी आणलेली नाही. मात्र, डॉक्टरांना असिडोसीसीच्या प्रमाणावर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याचा तसेच किटोअॅसिडोसीसचे कोणतीही लक्षणे दिसल्यास सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे.
४त्यात श्वास घेण्याला त्रास, ओकारी, पोटात दुखणे, संभ्रमाची अवस्था, अतिशय थकवा किंवा झोपेची गुंगी राहणे यासारखी लक्षणे दिसतात.