'इंडिगो'च्या अडचणी वाढल्या, दोन विमानांमध्ये तांत्रिक बिघाडानंतर DGCA अ‍ॅक्शन मोडमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 04:39 PM2023-08-30T16:39:27+5:302023-08-30T16:40:34+5:30

उड्डाणाचे इंजिन हवेतच बिघडल्याने अनेक प्रश्न उपस्थित

two indigo flights reported engine shut down in mid air dgca investigate incident in action mode | 'इंडिगो'च्या अडचणी वाढल्या, दोन विमानांमध्ये तांत्रिक बिघाडानंतर DGCA अ‍ॅक्शन मोडमध्ये!

'इंडिगो'च्या अडचणी वाढल्या, दोन विमानांमध्ये तांत्रिक बिघाडानंतर DGCA अ‍ॅक्शन मोडमध्ये!

googlenewsNext

Indigo technical glitch, DGCA action mode: कोलकाता ते बेंगळुरू आणि मदुराई-मुंबई या इंडिगो फ्लाइटमधील तांत्रिक त्रुटींमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही तासांतच इंडिगोच्या दोन विमानांचे इंजिन बिघडले. आता उड्डाणाचे इंजिन हवेतच बिघडल्याने डीजीसीए अँक्शन मोड मध्ये आली असून इंडिगोवर कारवाई सुरू झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मंगळवारी कमी किमतीच्या विमान कंपनी इंडिगोचे दोन विमानांच्या इंजिनमधील समस्यांबाबत 'तांत्रिक मूल्यांकन' करत आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

मंगळवारी इंडिगोच्या दोन विमानांना टेक ऑफ दरम्यान इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. एक फ्लाइट कोलकाताहून बेंगळुरूला जात होती तर दुसरी फ्लाइट मदुराईहून मुंबईला जात होती. एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की कोलकाता-बेंगळुरू फ्लाइट क्रमांक 6E 455 वर टेक-ऑफ केल्यानंतर, तांत्रिक समस्येमुळे विमानाला कोलकात्यात परत उतरावे लागले. या दरम्यान, विहित कार्यप्रणालीचे पालन करून वैमानिकाने विमान कोलकाता येथे सुरक्षितपणे उतरवले. इंडिगोच्या म्हणण्यानुसार, मंगळवारीच मदुराई-मुंबई फ्लाइट क्रमांक 6E-2012 मध्येही लँडिंगपूर्वी तांत्रिक समस्या निर्माण झाली. खबरदारी घेत पायलटने विमान मुंबईत उतरवले. आता आवश्यक देखभाल केल्यानंतरच हे विमान पुन्हा कार्यान्वित केले जाईल.

डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, दोन्ही घटना त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, एअरलाइनसह या समस्येचे तांत्रिक मूल्यांकन केले जात आहे. इंडिगोच्या विमानांमध्ये Pratt & Whitney (P&W) कंपनीची इंजिने वापरली जातात. जून अखेरीस एअरलाईन्सच्या ताफ्यात अशी ३१६ विमाने होती. त्यामुळे आता हे मूल्यांकन केले जात असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: two indigo flights reported engine shut down in mid air dgca investigate incident in action mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.