पाकच्या तोफमाऱ्यात दोन जखमी, भारताचं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 06:06 AM2020-04-16T06:06:38+5:302020-04-16T06:06:46+5:30

मांजकोटे सेक्टरमधील राजधानी भागातील लामिबारी खेड्यात नाजीर हुस्सेन यांच्या घरावर सीमेपलीकडून उखळी तोफेतून गोळा पडला. त्यामुळे रफिक खान (७०) आणि सोनिया शबीर (१०) हे जखमी झाले.

Two injured in Pak artillery attack | पाकच्या तोफमाऱ्यात दोन जखमी, भारताचं चोख प्रत्युत्तर

पाकच्या तोफमाऱ्यात दोन जखमी, भारताचं चोख प्रत्युत्तर

Next

जम्मू : पाकिस्तान लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर मंगळवारी रात्री केलेल्या तोफमाºयात १० वर्षांच्या मुलीसह एकाच कुटुंबातील दोन जण जखमी झाले, असे बुधवारी अधिकाºयाने सांगितले.

मांजकोटे सेक्टरमधील राजधानी भागातील लामिबारी खेड्यात नाजीर हुस्सेन यांच्या घरावर सीमेपलीकडून उखळी तोफेतून गोळा पडला. त्यामुळे रफिक खान (७०) आणि सोनिया शबीर (१०) हे जखमी झाले. त्यांची पोलिसांच्या तुकडीने सुटका केली व राजौरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
पाकिस्तानी लष्कराने मांजकोटे सेक्टरमध्ये समोरील खेड्यांना तोफांच्या माºयाचे लक्ष्य केले. याशिवाय पूंछ जिल्ह्याजवळ मंगळवारी रात्री उशिरा बालाकोट आणि मेंधारमध्ये असाच मारा पाक लष्कराने केला होता.

अधिकाºयाने सांगितले की, मेंधार गावात बुधवारी सकाळी निवासी वस्तीजवळ स्फोट न झालेला तोफगोळा आढळला. नंतर लष्करी अधिकाऱ्यांनी तो निकामी केला. पाकिस्तानी सैन्याने कथुआ जिल्ह्याच्या हिरानगर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागांत तोफांचा मारा केला. यामुळे सीमेवरील रहिवाशांत घबराट निर्माण झाली होती. (वृत्तसंस्था)

या हल्ल्याला भारताच्या लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशांत तोफांचा मारा काही तास सुरू होता. भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्करी जवानांचा मृत्यू झाला की नाही, हे लगेच समजले नाही.

Web Title: Two injured in Pak artillery attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.