ट्रॅक्टरची दुचाकीस्वाराला धडक धानवडचे दोन जखमी : वाळूचे ट्रॅक्टर समजून जमावाने झोडपले चालकाला

By admin | Published: January 21, 2016 12:04 AM2016-01-21T00:04:10+5:302016-01-21T00:04:10+5:30

जळगाव: विटा खाली करून रिधूरला जाणार्‍या ट्रॅक्टरने रिक्षाला ओव्हरटेक करताना समोरुन येणार्‍या दुचाकीला धडक दिल्याने प्रमोद सुभाष पाटील (वय २५) व संजय भास्कर पाटील (वय २७) दोन्ही रा.धानवड हे दोन जण जखमी झाले. वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याचे समजून संतप्त जमावाने चालक पंडित गोविंदा जगताप (वय ३५ रा.रधुर ता.जळगाव) याला बेदम मारहाण केली. हा प्रकार बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजता शनी पेठमधील मायक्का मंदिराजवळ घडला.

Two injured in road accident in Tractor; | ट्रॅक्टरची दुचाकीस्वाराला धडक धानवडचे दोन जखमी : वाळूचे ट्रॅक्टर समजून जमावाने झोडपले चालकाला

ट्रॅक्टरची दुचाकीस्वाराला धडक धानवडचे दोन जखमी : वाळूचे ट्रॅक्टर समजून जमावाने झोडपले चालकाला

Next
गाव: विटा खाली करून रिधूरला जाणार्‍या ट्रॅक्टरने रिक्षाला ओव्हरटेक करताना समोरुन येणार्‍या दुचाकीला धडक दिल्याने प्रमोद सुभाष पाटील (वय २५) व संजय भास्कर पाटील (वय २७) दोन्ही रा.धानवड हे दोन जण जखमी झाले. वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याचे समजून संतप्त जमावाने चालक पंडित गोविंदा जगताप (वय ३५ रा.रधुर ता.जळगाव) याला बेदम मारहाण केली. हा प्रकार बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजता शनी पेठमधील मायक्का मंदिराजवळ घडला.
रिधूर येथील भगवान दशरथ कुंभार यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (क्र.एम.एच.१९ ए.एन.२०८७) घेऊन पंडित जगताप हा विटा घेऊन शहरात आला होता. विटा खाली केल्यानंतर रिधूरला परत जात असताना मायक्का देवी व हनुमान मंदिराच्यामध्ये वळणावर रिक्षाला ओव्हरटेक करताना समोरुन येणारी दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.व्ही.७५२३) ट्रॅक्टरवर आदळली. यात पुढच्या दोन्ही चाकांमध्ये दुचाकी आल्याने संजय पाटील व प्रमोद पाटील यांना मार लागला. यात संजय याच्या पायाला लागले आहे तर प्रमोद याला किरकोळ मार लागला आहे.
अन् जमाव संतप्त झाला
हा अपघात झाल्यानंतर परिसरातील लोकांनी धाव घेऊन दुचाकीस्वाराला बाजूला केला व ट्रॅक्टर चालक पंडित जगताप याला मारायला सुरुवात केली. जमावाच्या या मारहाणीत जगताप घायाळ झाला. त्याच वेळी या रस्त्याने एका शेतकर्‍याचे ट्रॅक्टर आले, ते ट्रॅक्टरही लोकांना अडविले नंतर डंपरही अडविण्यात आले. वाळूचे वाहने समजून जमावाचा मोठा उद्रेक झाला.
मोठी घटना टळली
वाळूच्या ट्रॅक्टरमुळे अपघात झाल्याची अफवा पसरल्यानंतर जमाव मोठ्या संख्येने घटनास्थळावर चालून आला होता. चालकाला मारहाण होत असल्याचे समजताच शनी पेठचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी कर्मचारी घटनास्थळावर पाठविले. त्यांनी चालकाला जमावाच्या तावडीतून सोडून ताब्यात घेतले तर जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठविले. पोलीस वेळेवर पोहचले नसते तर वाहन जाळले जाण्याची शक्यता होती तसेच चालकाच्याही जीवाला धोका निर्माण झाला असता.
गैरसमज दूर झाला
पोलिसांनी ट्रॅक्टर व चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते ट्रॅक्टर वाळूचे नसल्याचे स्पष्ट झाले. विटांचे ट्रॅक्टर असल्याने जमाव शांत झाला. चालकाला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याने दुचाकीस्वारच आपल्या अंगावर आल्याचे सांगीतले. या घटनेच्या वेळी आलेले दुसरे ट्रॅक्टरही शेतकर्‍याचेच निघाले. एक डंपर मात्र रिकामा होता, तो वाळूचाच असल्याचा संशय नागरिकांना होता.

Web Title: Two injured in road accident in Tractor;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.