जम्मू-काश्मीरमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'च्या दोन दहशतवाद्यांना अटक

By admin | Published: October 22, 2016 11:25 AM2016-10-22T11:25:26+5:302016-10-22T11:32:41+5:30

बारामुल्ला परिसरातून 'जैश-ए-मोहम्मद'या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना शस्त्रांसहीत अटक करण्यात आली आहे.

Two Jaish-e-Mohammed terrorists arrested in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'च्या दोन दहशतवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीरमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'च्या दोन दहशतवाद्यांना अटक

Next

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 22 - जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरातून 'जैश-ए-मोहम्मद'या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना शस्त्रांसहीत अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एके-47, एक पिस्तुलसहीत शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, याआधी जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये एक पाकिस्तानी हेरदेखील पकडण्यात आला आहे.
 
बोधराज असे ताब्यात घेण्यात आलेल्या हेराचे नाव आहे. त्याच्याकडे पाकिस्तानातील दोन सिम कार्ड आणि काही नकाशे आढळले होते. गंभीर बाब म्हणजे या नकाशांमध्ये भारतीय सुरक्षा दलांना कोणत्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे, याची माहिती होती. सध्या, सुरक्षा यंत्रणा त्याची कसून चौकशी करत आहेत. याआधी ऑगस्ट महिन्यातही राजस्थानमधून एक हेर पकडण्यात आला होता. त्याच्याजवळही अशाच प्रकारे काही नकाशे आणि छायाचित्रं सापडली होती. 
 
आणखी बातम्या
सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी हेराला अटक, सापडले लष्कराच्या तैनातीचे नकाशे
नापाक गोळीबाराला BSF चे चोख प्रत्युत्तर, ७ पाकिस्तानी सैनिक ठार
जम्मूमध्ये पाकिस्तानचा पुन्हा BSF चौक्यांवर गोळीबार
 
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून बिथरलेल्या पाकिस्तानच्या सीमारेषेवर कुरापती सुरूच आहेत. शुक्रवारी रात्रीदेखील आर.एस.पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. सीमारेषेवर होणा-या गोळीबाराला भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र सततच्या होणा-या हल्ल्यामुळे सीमारेषेजवळील गावात राहणा-या लोकांना जगणे कठीण झाले आहे. 
 

Web Title: Two Jaish-e-Mohammed terrorists arrested in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.