जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद

By admin | Published: September 11, 2015 09:11 AM2015-09-11T09:11:54+5:302015-09-11T09:17:57+5:30

जम्मू काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा यंत्रणा व दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी रात्रीपासून सुरु असलेल्या चकमकीत सैन्याचे दोन जवान शहीद झाले आहेत.

Two jawans martyr in an encounter in Jammu Kashmir | जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद

Next

ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. ११ - जम्मू काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा यंत्रणा व दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी रात्रीपासून सुरु असलेल्या चकमकीत सैन्याचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आले आहे. 

हंदवाडा येथील लारीबल गावातील घनदाट जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी जंगलात शोधमोहीम सुरु केली होती. या मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी सैन्याच्या जवानांवर गोळीबार केला. यात दोन जवान शहीद झाले तर जवानांनी गोळीबारात दोघा दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. आणखी काही दहशतवादी जंगलात लपून बसले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

Web Title: Two jawans martyr in an encounter in Jammu Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.