काश्मीरमध्ये लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद; कमांडो पथक दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 11:13 AM2018-02-10T11:13:43+5:302018-02-10T11:36:19+5:30
लष्करी तळाच्या जवळ पहाटेपासून काही संशयास्पद हालचाली जाणवत होत्या.
श्रीनगर: काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी केला. या हल्ल्यात ज्युनिअर कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे.
शहीद झालेल्या जवानांमध्ये जेसीओ मदन लाल चौधरी यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पहाटे केलेल्या गोळीबारात ते आणि त्यांची मुलगी जखमी झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चौधरी यांचा मृत्यू झाला.
जम्मू-पठाणकोट महामार्गानजीक असणाऱ्या सुंजवा लष्करी तळावर पावणे पाच वाजता हा हल्ला झाला. लष्करी तळाच्या जवळ पहाटेपासून काही संशयास्पद हालचाली जाणवत होत्या. पहाटे पावणे पाचच्या सुमारास सुंजवा लष्करी कॅम्पवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. यावेळी दहशतवादी जवळच्या रहिवासी इमारतीमध्ये लपून बसले. त्यानंतर भारतीय लष्कराने हा संपूर्ण परिसर खाली करून कारवाईला सुरूवात केली. काही तास दोन्ही दिशेने गोळीबार सुरू होता. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत. मात्र, दहशतवाद्यांची नेमकी संख्या माहिती नसल्यामुळे सध्या लष्कराकडून ड्रोनद्वारे संबंधित परिसराची पाहणी सुरु आहे.
9 फेब्रुवारी 2013 रोजी अफजल गुरूला फाशी दिल्याच्या घटनेला यंदा पाच वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी अशाप्रकारच्या हल्ल्याचा इशारा सुरक्षा दलांना दिला होता. गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तर दहशतवाद्यांकडून लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी 5 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी पुलवामाच्या काकापुरा येथील 50व्या राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीवर हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार आणि ग्रेनेडस् फेकण्यात आले होते. या हल्ल्यात भारतीय जवानांना कोणतीही इजा झाली नसली तरी दहशतवादी येथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
Have been raising issue of Bangladeshis & Rohingyas living in surrounding areas of Jammu, illegally. They are increasing,if not stopped they'll act as militant orgs' shelter & this may also be connected to them,investigation must be done: BJP MLC Vikram Randhawa on #SunjwanAttackpic.twitter.com/MlQPrRyW3W
— ANI (@ANI) February 10, 2018
#FLASH Sunjwan Army Camp Attack: IAF para commandos airlifted to Jammu from Udhampur, this morning. Another aircraft is airborne to airlift para commandos from Sarsawa. pic.twitter.com/Qzk12SUtGt
— ANI (@ANI) February 10, 2018
#FLASH: One Army personnel lost his life, while two others are injured in Sunjwan Army Camp terror attack #JammuAndKashmirpic.twitter.com/rTlNVRUhxl
— ANI (@ANI) February 10, 2018
#UPDATE: Gunshots head inside Sunjwan Army camp as operation continues. Schools within 500 meters of the camp have been asked to remain closed by district administration (visuals deferred by unspecified time) #JammuAndKashmirpic.twitter.com/EJcWKWfz1u
— ANI (@ANI) February 10, 2018
Have been raising issue of Bangladeshis & Rohingyas living in surrounding areas of Jammu, illegally. They are increasing,if not stopped they'll act as militant orgs' shelter & this may also be connected to them,investigation must be done: BJP MLC Vikram Randhawa on #SunjwanAttackpic.twitter.com/MlQPrRyW3W
— ANI (@ANI) February 10, 2018