जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीफच्या बसवर झालेल्या हल्यात 2 जवान शहीद
By admin | Published: February 20, 2016 05:48 PM2016-02-20T17:48:38+5:302016-02-20T19:04:48+5:30
जम्मू काश्मीरमध्ये पेट्रोलिंग करणा-या सीआरपीएफ जवानांच्या बसवर हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे
Next
ऑनलाइन लोकमत
जम्मू काश्मीर, दि. 20 - जम्मू काश्मीरमध्ये पेट्रोलिंग करणा-या सीआरपीएफ जवानांच्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. सीआरपीएफ जवानांच्या बसवर काही अज्ञातांनी फायरिंग केली. या हल्यात 10 जवान जखमी झाले आहेत तर 2 जवान शहीद झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. हल्लेखोर ईडीआय या कंपनीत लपून बसल्याची माहिती मिळत आहे. आतमध्ये अकडलेल्या कंपनीच्या सर्व कर्मचा-यांना बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र अजून कोणी आत अडकले आहे का याची माहिती घेतली जात आहे. 3 दहशतवादी इमारतीत लपले असल्याची शक्यता असल्याने लष्कराने संपुर्ण परिसर सील केला आहे.
Pampore (J&K): Unidentified gunmen fired on CRPF bus, 7 CRPF jawans injured (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/GJc1eXEXyP
— ANI (@ANI_news) February 20, 2016