काश्मीरमध्ये लष्करचे दोन अतिरेकी ठार, एकास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:50 AM2018-06-25T02:50:28+5:302018-06-25T02:50:31+5:30
दक्षिण काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात रविवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तैयबा’चे दोन अतिरेकी
श्रीनगर : दक्षिण काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात रविवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तैयबा’चे दोन अतिरेकी ठार झाले तर तिसऱ्या अतिरेक्याने शस्त्र व दारुगोळ््यासह शरणागती पत्करली. सुरक्षा दलांच्या या कारर्वास
विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने
रस्त्यांवर येऊन दगडफेक सुरु केली. या हिंसक जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैमोह तालुक्यातील चिद्दर गावातील एका घरात अतिरेकी लपून बसले आहेत अशी पक्की खबर मिळाल्याने लष्कराचे जवान व पोलिसांनी त्या इमारतीस वेठा घातला. लपलेल्या अतिरेक्यांनी शरण येण्याऐवजी गोळीबार सुरु केला. सुरक्षा दलांनीही गोळीबाराने जोरदार प्रत्युत्तर दिले.सुमारे दोन तास चाललेल्या या कारवाईत इमारतीत लपलेले दोन अतिरेकी ठार झाले. त्यापैकी एक शकूर अहमद दर हा लष्कर-ए-तैयबाचा स्थानिक कमांडर होता.
शाकीर अहमाद नावाच्या तिसºया अतिरेक्याने पळून जाणे अशक्य झाल्यावर शरणागती पत्करली. स्थानिक काश्मिरी युवक असलेला शाकीर दोनच महिन्यांपूर्वी
अतिरेक्यांना जाऊन मिळाला होता, असे समजते.
सुरक्षा दलांची ही कारवाई सुरु असताना स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर येऊन दगडफेक सुरु केली. त्या जमावास आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी आधी अश्रुधूर, पेलेट गन व नंतर बंदुकांचा वापर केला.
पोलिसांच्या गोळीबारात निदर्शकांपैकी यावर अहमद दर हा गस्सीपुरा येथील युवक गंभीर जखमी झाला. नंतर अनंतनाग येथील इस्पितळात त्याचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)
मेहबूबा यांनी टष्ट्वीटरवर लिहिले की, आघाडी सरकारचा अॅजेंडा राम माधव यांनीच तयार केला होता व राजनाथ सिंग यांच्यासह भाजपाच्या नेतृत्वाने त्यास मान्यता दिली होती. आम्ही त्या अॅजेंड्याचे पालन केले. सत्तेत असताना भाजपाच्या एकाही मंत्र्याने त्याविषयी तक्रार केली नाही. मात्र आता त्या पक्षाने हात वर करून आमच्यावर खापर फोडावे हा तद्दन खोटेपणा आहे. आमच्यावर आरोप करण्याऐवजी भाजपाच्या मंत्र्यांनी आधी आपण स्वत: काय काम केले हे तपासून पाहायला हवे होते.