‘इसिस’चे अपहृत दोन प्राध्यापक घरी परतले

By admin | Published: September 25, 2016 03:03 AM2016-09-25T03:03:30+5:302016-09-25T03:03:30+5:30

इस्लामिक स्टेटने (इसिस) लीबियामध्ये अपहरण करून गेले वर्षभर डांबून ठेवलेले टी. गोपी कृष्ण आणि सी. बसराम किशन या मुळच्या आंध्र प्रदेशमधील दोन प्राध्यापकांची सुटका झाली

Two kidnapped two professors of Isis returned home | ‘इसिस’चे अपहृत दोन प्राध्यापक घरी परतले

‘इसिस’चे अपहृत दोन प्राध्यापक घरी परतले

Next

हैदराबाद : इस्लामिक स्टेटने (इसिस) लीबियामध्ये अपहरण करून गेले वर्षभर डांबून ठेवलेले टी. गोपी कृष्ण आणि सी. बसराम किशन या मुळच्या आंध्र प्रदेशमधील दोन प्राध्यापकांची सुटका झाली
असून ते शनिवारी पहाटे हैदराबादमधील आपापल्या घरी सुखरूप पोहोचले.
इसिसच्या तावडीतून सुटका झालेल्या या प्राध्यापकांना परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी पहाटे विमानतळावर घेऊन आले. त्यांच्या आगमनाविषयी गुप्तता ठेवण्यात आली होती. या दोघांच्या कुटुंबियांना ते घरी आल्यावर आनंदाचा धक्काच ‘इसिस’च्या ताब्यातील बंदिवासाने ते मानसिक धक्क्यातून सावरले नसल्याने बोलण्याच्या स्थितीत नव्हते.
गोपी कृष्ण व बलराम किशन
हे तिरकिटच्या विद्यापीठात
अध्यापक होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये ‘इसिस’ने तिरकिट शहरावर कब्जा केला, तेव्हा दोघांसह कर्नाटकातील लक्ष्मीकांत व विजयकुमार अशा चार भारतीयांचे अपहरण केले गेले होते. लक्ष्मीकांत व विजयकुमार या दोघांना २४ तासांत सोडण्यात आले होते. मात्र गोपीकृष्ण आणि बलराम मात्र
गेले वर्षभर ‘इसिस’च्या ताब्यात
होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Two kidnapped two professors of Isis returned home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.