कार झाडावर आदळून दोन ठार, सहा जखमी नगर-कल्याण मार्गावरील घटना

By Admin | Published: May 22, 2015 12:24 AM2015-05-22T00:24:59+5:302015-05-22T00:24:59+5:30

आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर ठाणे जिल्‘ाच्या मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावच्या शिवारात मोटारकार झाडावर आदळून बुधवार (दि. २०) दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन ठार व सहा जण जखमी झाले. मृत व जखमी हे सर्व जण आळेफाट्याजवळील संतवाडी व नारायणगाव येथील रहिवासी आहेत.

Two killed and six injured on the car tree, the incident happened on the injured city-Kalyan route | कार झाडावर आदळून दोन ठार, सहा जखमी नगर-कल्याण मार्गावरील घटना

कार झाडावर आदळून दोन ठार, सहा जखमी नगर-कल्याण मार्गावरील घटना

googlenewsNext
ेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर ठाणे जिल्‘ाच्या मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावच्या शिवारात मोटारकार झाडावर आदळून बुधवार (दि. २०) दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन ठार व सहा जण जखमी झाले. मृत व जखमी हे सर्व जण आळेफाट्याजवळील संतवाडी व नारायणगाव येथील रहिवासी आहेत.
रमेश भाऊ पाडेकर (वय ६५) व स्वरा दिनेश पाडेकर (वय ७) अशी मृत व्यक्तींची नावे असून, टोकावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आळेफाटा येथून मुंबईकडे इंडिका कारमधून (क्र. एम. एच. १२, सी आर ३९०) रमेश पाडेकर हे आपल्या नातेवाइकांसमवेत जात असताना मोरोशी (ता. मुरबाड) शिवारात ही कार एका झाडावर जोरदारपणे आदळली. यामध्ये रमेश पाडेकर व स्वरा दिनेश पाडेकर हे गंभीर जखमी होऊन मृत पावले. तर, कारमधील अंशुल दिनेश पाडेकर (वय ११), मंदाकिनी रमेश पाडेकर (वय ६०), चालक महादेव रामचंद्र पाडेकर (वय-३४, सर्व राहणार संतवाडी ) व सहारा पांडुरंग वाजगे (वय ७), ईशा पांडुरंग वाजगे (वय १२), नीता पांडुरंग वाजगे (वय-४५) सर्व रा. वाजगेमळा, नारायणगाव हे जखमी झाले.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर सर्व जखमींना आळेफाटा येथील रुग्णवाहिकांद्वारे येथे आणण्यात आले. यातील काही जण गंभीर जखमी असल्याने त्यांना आळेफाटा येथील प्राथमिक उपचारानंतर पुढे पुणे येथे उपचारासाठी सायंकाळच्या सुमारास नेण्यात आले. अपघाताचा पुढील तपास टोकावडे पोलिसांमार्फत सुरू आहे.

Web Title: Two killed and six injured on the car tree, the incident happened on the injured city-Kalyan route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.