दोन लाखांवर विद्यार्थी राहू शकतात वंचित
By admin | Published: February 11, 2015 11:19 PM2015-02-11T23:19:38+5:302015-02-11T23:19:38+5:30
दोन लाखांवर विद्यार्थी राहू शकतात वंचित
Next
द न लाखांवर विद्यार्थी राहू शकतात वंचितशिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयातच प्रलंबित : अद्यापपर्यंत फक्त ७० हजार अर्ज निकाली नागपूर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले, मात्र ते समाजकल्याण विभागाला अद्यापही मिळाले नाही. विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयात प्रलंबित असल्यामुळे लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. नागपूर विभागात महाविद्यालय पातळीवर प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या २,२३,९६४ आहे. शैक्षणिक सत्र २०१४-१५ या वर्षातील शिष्यवृत्तीसाठी अद्यापपर्यंत ३,३४,३४४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. १५ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्जासोबत विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दस्तऐवज महाविद्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जमा केले आहे. शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी हे दस्तऐवज समाजकल्याण विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे. समाजकल्याण विभाग कागदपत्रांची स्क्रूटीनी करून शिष्यवृत्ती मंजूर करते. मात्र अनेक महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठविलेच नाही. अशा विद्यार्थ्यांची संख्या २,२३,९६४ आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयांनी विभागाला अर्ज उपलब्ध करून न दिल्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या सत्रात विभागाकडे अद्यापपर्यंत ७०,५७१ अर्ज प्राप्त झाले. यातील ६९,१४४ अर्ज विभागाने मंजूर केले, तर १४२७ अर्जांमध्ये त्रुटी असल्याने नाकारण्यात आले. चौकटविभागनिहाय अर्जाची सद्यस्थितीजिल्हा नोंदणीकृत अर्जमहाविद्यालय पातळीवर प्रलंबित अर्जवर्धा ४२५७८ २७३२३नागपूर १५४७४५ १०८७०९भंडारा ३५३०३ १७४३२गोंदिया २९६०३ २९२०२गडचिरोली१७४०५ ९२५७चंद्रपूर ५४७१० ३२०३६::::चौकट:::महाविद्यालयांबरोबर विद्यार्थ्यांकडूनही निष्काळजीपणाविद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्याबरोबर आवश्यक कागदपत्रांचे दस्तऐवज महाविद्यालयात जमा करावे लागतात. विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज भरतात, मात्र कागदपत्रे महाविद्यालयात जमा करीत नाही. तर महाविद्यालयही विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांच्या मागणीसाठी तगादा लावत नाही. सरकारी महाविद्यालयाकडून शिष्यवृत्तीची प्रक्रिया राबविण्याबद्दल अतिशय निष्काळजी केली जाते. त्यामुळे महाविद्यालय पातळीवर मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित राहतात.::::चौकट:::समाजकल्याण विभागाचा महाविद्यालयांना इशारा वेळेवर अर्ज आल्यास त्याची स्क्रूटीनी करणे कठीण जाईल व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळू शकणार नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज कार्यालयाला वेळेच्या आत मिळावे म्हणून विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या बैठका घेण्यात येत आहे. बैठकांमध्ये महाविद्यालयाला कारवाईचा इशाराही देण्यात येत आहे. असे असतानाही महाविद्यालयाकडून गांभीर्याने घेतले जात नाही. शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेत राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. महाविद्यालय उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळावी म्हणून महाविद्यालयांना निर्देश देणे गरजेचे आहे, अन्यथा लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील. आर.डी. आत्राम, विभागीय समाजकल्याण अधिकारी