दंतेवाडा चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:30 PM2019-05-08T13:30:52+5:302019-05-08T13:44:40+5:30
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
रायपूर - छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील दंतेवाडात जिल्हा राखीव सैनिक (डीआरजी) व विशेष कृती दलाच्या जवानांनी गोंदरस जंगलात ही संयुक्त कारवाई केली आहे. अरनपूरजवळ असलेल्या गोंदरसच्या जंगलात ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पहिल्यांदाच महिला कमांडो सहभागी झाल्या होत्या. घटनास्थळावरून एक रायफल, 12 बंदुकांसह मोठ्या प्रमाणात दारू गोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
SP Dantewada Abhishek Pallava says, "District Reserve Guard female commandos “Danteshwari Ladake” also took part in this encounter". 30 women including surrendered Naxals cadres or wives of surrendered cadres were recruited in the only woman DRG platoon in Dantewada.#Chhattisgarhhttps://t.co/pbzrP8Rezj
— ANI (@ANI) May 8, 2019
दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डीआरडी आणि एसटीएफने केलेल्या या संयुक्त कारवाईत डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड फिमेल कमांडोज (दंतेश्वरी दल) सहभागी झाल्या होत्या. या महिलांच्या तुकडीत नक्षली महिला अथवा शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या पत्नींना सहभागी करून घेतलं जातं. एकूण 30 महिला या दलात असतात. त्यांना प्रशिक्षण दिलं जातं.'
Dantewada: Bodies of 2 Naxals recovered following an exchange of fire b/w Naxals & joint team of DRG&STF in Gonderas jungle in Aranpur police station area around 5 am today. One INSAS rifle&one 12 Bore weapon with ammunition & other incriminating materials recovered.#Chhattisgarh
— ANI (@ANI) May 8, 2019
छत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त
छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (21 एप्रिल) चकमक झाली होती. छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. बिजापूर येथे सकाळी सर्च ऑपरेशन सुरू असताना जंगलात लपून बसलेल्या काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला होता. चकमकीदरम्यान दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले होते. नक्षलवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. छत्तीसगडच्या कुआकोंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धनिकरका वन क्षेत्रात गुरुवारी (18 एप्रिल) चकमक झाली होती. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर चकमकी दरम्यान एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला होता. दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले असून त्यामध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर वर्गीसचा समावेश होता. वर्गीसवर पाच लाखांचे बक्षिस होते.
छत्तीसगडमधील चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा
सुकमामधील बिमापूरममध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी (26 मार्च) चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा येथे नक्षलवादी आणि कमांडो बटालियन दरम्यान चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. बिमापूरमपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर ही चकमक झाली. कोबरा 201 बटालियनचे कमांडो सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी कमांडोंच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला होता. या गोळीबारात 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. या चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले. नक्षलवाद्यांकडून 1 रायफल आणि दोन थ्री नॉट थ्री रायफल ताब्यात घेण्यात आल्या होत्या.
Naxal Encounter : जवानांच्या चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा
झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत पीपल्स लिबरेशन फ्रंटचा (पीएलएफआय) एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. या नक्षलवादी संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई राबवली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास जवानांनी पीएलएफआयच्या नक्षलवाद्याला कंठस्नान घातले होते.
रांचीचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) ए.बी.होमकर यांनी कारवाईबाबत माहिती दिली होती. होमकर म्हणाले की, रनिया पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये गुरूवारी पहाटेच्या सुमारास चमकम उडाली होती. नक्षलविरोधी मोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. दरम्यान, जवानांनी घटनास्थळावरुन शस्त्रसाठा ताब्यात घेतला होता.