चकमकीत दोन अतिरेकी ठार, पाकिस्तानी अतिरेक्याचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:31 AM2021-06-30T08:31:03+5:302021-06-30T08:31:16+5:30

लष्कर- ए- तोयबाचा कमांडर, पाकिस्तानी अतिरेक्याचा समावेश

Two militants were killed in the clashes, including a Pakistani militant | चकमकीत दोन अतिरेकी ठार, पाकिस्तानी अतिरेक्याचा समावेश

चकमकीत दोन अतिरेकी ठार, पाकिस्तानी अतिरेक्याचा समावेश

googlenewsNext

श्रीनगर : काश्मिरात पारिमपोरा भागात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत मंगळवारी लष्कर- ए- तोयबाचा कमांडर नदीम अबरार  आणि एका पाकिस्तानी अतिरेक्यास ठार मारण्यात आले. अबरार हा हत्येच्या अनेक प्रकरणात सहभागी होता. त्याला सोमवारी पारिमपोरामध्ये अटक करण्यात आली होती. पारिमपोरा भागात नाक्यावर एक वाहन रोखण्यात आले. याचवेळी  मागे बसलेल्या एका व्यक्तीने बॅगमधून ग्रेनेड काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तत्काळ पकडले. वाहनचालक आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर लक्षात आले की, तो लष्करचा कमांडर अबरार आहे. अबरार याने ज्या ठिकाणी एके- ४७ असल्याचे सांगितले त्या ठिकाणी घेराव घालण्यात आला. 

सुरक्षा दल आतमध्ये दाखल होऊ लागले तेव्हा अबरारच्या एका पाकिस्तानी साथीदाराने गोळीबार सुरू केला. यात सीआरपीएफचे तीन जवान आणि अबरार जखमी झाला. 

ड्रोनच्या प्रयोगावर लक्ष देण्याची गरज : भारताची भूमिका

संयुक्त राष्ट्रे : अतिरेकी कारवायांसाठी शस्त्रास्त्रांच्या स्वरूपात ड्रोनचा प्रयोग होण्याची भीती व्यक्त करत जागतिक समुदायाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सभेत व्यक्त केले. 

जम्मूत हवाई दलाच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ही चिंता व्यक्त केली आहे. गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. एस. कौमुदी यांनी म्हटले आहे की, आज अतिरेकी भरतीसाठी आणि अन्य कामांसाठी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा दुरुपयोग करत आहेत.

Web Title: Two militants were killed in the clashes, including a Pakistani militant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.