कारवार दुर्घटनेतील आणखी दोन मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 03:26 PM2019-01-22T15:26:37+5:302019-01-22T15:34:05+5:30

मृतांची संख्या 10 वर; अद्याप पाचजण बेपत्ता, शोधकार्य सुरु 

Two more death bodies were found in the karwar tragedy | कारवार दुर्घटनेतील आणखी दोन मृतदेह सापडले

कारवार दुर्घटनेतील आणखी दोन मृतदेह सापडले

Next
ठळक मुद्देबेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी एकूण पाच वेगवेगळी पथके कार्यरत असून नौदलाच्या दोन हॅलिकॉप्टरद्वारेही शोधकाम चालू आहे.दरवर्षी कुर्मगडावरील या बेटावर श्री नृसिंहाच्या जत्रेला कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील हजारो भाविक जात असतात. 

सुशांत कुंकळयेंकर

मडगाव - कारवार येथील अरबी समुद्रात होडी उलटून झालेल्या दुर्घटनेतील आणखी दोन मृतदेह आज दुपारपर्यंत सापडल्याने एकूण मृतांची संख्या 10 वर पोहोचली असून अद्याप पाचजण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी एकूण पाच वेगवेगळी पथके कार्यरत असून नौदलाच्या दोन हॅलिकॉप्टरद्वारेही शोधकाम चालू आहे.

कारवार समुद्रातील कुर्मगड बेटावरील श्री नृसिंह मंदिराची जत्र आटोपून भाविकांना घेऊन परत येणारी एक होडी सोमवारी दुपारी समुद्रात उलटल्याने ही दुर्घटना घडली होती. या होडीत एकूण 33 प्रवासी होते. त्यापैकी 18 जणांना पाण्यातून बाहेर काढले होते. सोमवारी रात्रीपर्यंत आठ जणांचे मृतदेह सापडले होते.

स्थानिकांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणो, ज्या ठिकाणी अरबी समुद्र व काळी नदी यांचा संगम होतो त्या ठिकाणी एक प्रचंड लाट या होडीला आपटल्याने ही होडी थोडीशी कलली होती. त्यामुळे होडीतील प्रवाशांनी घाबरुन होडीच्या दुसऱ्या टोकावर गर्दी केल्याने प्रवाशांच्या वजनामुळे ही होडी उलटली. त्यावेळी प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरल्याने या होडीला आधार देण्यासाठी इतर होडय़ाही येऊ शकल्या नव्हत्या. आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इतर होडीवाल्यांनी या होडीकडे येणो टाळले होते. याचवेळी कारवारच्या आमदार रुपाली नाईक मंदिरातील पूजा आटोपून परत येत असताना तिने आपल्या होडीतून या होडीतील सहा प्रवाशांना काठावर आणले होते. दरम्यान, आज बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे काम चालूच होते. बेपत्ता असलेल्यांच्या कुटुंबियांनी काळी नदीच्या तटावर आणि इस्पितळ परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे या परिसरातही गोंधळाचे वातावरण पसरले होते.

दरवर्षी कुर्मगडावरील या बेटावर श्री नृसिंहाच्या जत्रेला कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील हजारो भाविक जात असतात. सोमवारीही भाविक या जत्रेसाठी गेले होते. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, सोमवारी ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तेथे 1990 च्या दरम्यान अशीच एक पर्सिन बोट उलटून एकाला जलसमाधी मिळाली होती. तर 2008 मध्ये एक मच्छीमारी बोट उलटून दोघांना बुडून मृत्यू झाला होता.

कर्नाटकातील कारवारजवळ बोट बुडून 8 जणांचा मृत्यू  

Web Title: Two more death bodies were found in the karwar tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.