आणखी दोन जवान शहीद; पाकिस्तानकडून सीमेवर जोरदार गोळीबार सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 02:28 PM2020-10-01T14:28:06+5:302020-10-01T14:28:43+5:30
Pakistan ceasefire violation: पाकिस्तानच्या आगळीकीला भारतीय जवानही चोख प्रत्यूत्तर देत असून सीमेवर दोन्ही बाजुंकडून जोरदार गोळीबार सुरु आहे.
जम्मू : पाकिस्तानने सकाळी कृष्णा घाटीमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने त्या गोळीबारात लान्स नायक शहीद झालेले असताना पुन्हा कुपवारातील नौगाम सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. तर चार जवान जखमी झाले आहेत.
पाकिस्तानच्या आगळीकीला भारतीय जवानही चोख प्रत्यूत्तर देत असून सीमेवर दोन्ही बाजुंकडून जोरदार गोळीबार सुरु आहे.
Jammu and Kashmir: Two soldiers died, four injured after Pakistan initiated an unprovoked ceasefire violation along LoC in Nowgam Sector, Kupwara this morning. Indian Army is retaliating.
— ANI (@ANI) October 1, 2020
कृष्णा घाटीमध्ये झालेल्या गोळीबारात लान्स नायक करनेल सिंह शहीद झाले आहेत. तर अन्य एक जवान जखमी झाला आहे. या जखमी जवानाचे नाव विरेंद्र सिंह आहे. त्याच्या डोळ्याला मार बसला आहे. विरेंद्र सिंह यांना राजौरीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. सोमवारी पाकिस्तानच्या राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. या काळात पाकिस्तानकडून मोर्टार डागण्यात आले होते. यावर भारताकडूनही जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आले होते.