पेरोलवर बाहेर आलेल्या अल्पवयीन आरोपीनं दोन तासांत केले दोन खून

By admin | Published: May 18, 2017 05:21 PM2017-05-18T17:21:06+5:302017-05-18T17:21:27+5:30

चोरीच्या आरोपातल्या पेरोलवर बाहेर असलेल्या अल्पवयीन आरोपीनं मित्रांच्या सहाय्यानं दोन जणांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

Two murders made in two hours by a minor accused on bail | पेरोलवर बाहेर आलेल्या अल्पवयीन आरोपीनं दोन तासांत केले दोन खून

पेरोलवर बाहेर आलेल्या अल्पवयीन आरोपीनं दोन तासांत केले दोन खून

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - चोरीच्या आरोपातल्या पेरोलवर बाहेर असलेल्या अल्पवयीन आरोपीनं मित्रांच्या सहाय्यानं दोन जणांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य दिल्लीत हा प्रकार घडला आहे. अल्पवयीन आरोपीला एका आठवड्यापूर्वीच ज्युवेनाइल कोर्टानं पेरोल मंजूर केला होता. पेरोलवर बाहेर आल्यानंतर त्यानं सुडाच्या भावनेनं दोन जणांची हत्या केली.

पोलिसांच्या मते, अल्पवयीन आरोपीला चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याला बालसुधारगृहात पाठवलं होतं. याआधीही या आरोपीविरोधात रस्त्यावरील गुन्हे केल्याची प्रकरणे दाखल आहेत. पेरोलवर सुटल्यानंतर या आरोपीनं त्याचे जुने शत्रू सुनील आणि राहुल यांच्या बदला घेण्याचा कट आखला.

या कटात 22 वर्षांचा मनोज नावाचा एक व्यक्ती आणि तीन अन्य लोकांनी साथ दिली. त्यानंतर सुनीलला एक पार्कमध्ये बोलावून त्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. सुनीलच्या गळ्यातील चेन काढून त्या अल्पवयीन आरोपीनं पोबारा केला. पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला अटक केली असून, पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. इतर तीन आरोपींचीही पोलिसांनी ओळख पटवली आहे.   

Web Title: Two murders made in two hours by a minor accused on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.