दोन बातम्या स्ट्रीपसाठी

By admin | Published: August 3, 2015 10:26 PM2015-08-03T22:26:41+5:302015-08-03T22:26:41+5:30

For two news strips | दोन बातम्या स्ट्रीपसाठी

दोन बातम्या स्ट्रीपसाठी

Next
>धारावीत पाणीकपात
मुंबई : मरोशी ते रुपारेल दरम्यान भूमिगत जलबोगद्याचे काम पूर्ण झाले असले तरीही मरोशी ते सहार दरम्यान सहा ठिकाणी जोड करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुरु होणारे काम ७ ऑगस्टला रात्री १० वाजता पूर्ण होणार आहे. त्यामुळे ६ ऑगस्ट रोजी धारावीत गणेश मंदिर विभागात सायंकाळी ४ ते रात्री ९ दरम्यान कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तर ७ ऑगस्ट रोजी धारावी, ९० फुटी रस्ता, शाहूनगर, मील मार्ग, शीव-माहिम जोडरस्ता या भागांत पहाटे ४ ते सकाळी १० या वेळेत पाणी कपात करण्यात येणार आहे. तसेच, दिलीप कदम मार्ग येथे सायंकाळी ४ ते ९ या वेळेत कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. धारीवीतील प्रेमनगर, शताब्दीनगर, नाईकनगर, खामदेवनगर, आन्ध्रा व्हॅली या विभागात पाणीपुरवठा होणार नाही.

नाना शंकरशेट यांचे मोलाचे योगदान-राज्यपाल
मुंबई : आधुनिक मुंबईच्या उभारणीत जमशेदजी जिजीभाय, भाऊ दाजी लाड, डेविड ससून, जॉन विल्सन, न्या. बद्रुद्दीन तय्यबजी यांसह अनेक लोकांचा मोलाचा वाटा होता याचा उल्लेख करून नाना शंकरशेट या प्रभावळीतील एक दैदीप्यमान तारा होते असे उद्गार राज्यपालांनी काढले. मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांच्या १५० पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन तसेच अधर्पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोमवारी राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते वडाळा येथे पार पडले. तर याप्रसंगी उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाजात असे एकही क्षेत्र नव्हते जेथे नानांनी काम केले नाही, असे सांगत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शकरशेट यांचे नाव द्यावे अशी मागणी केली.

Web Title: For two news strips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.