पंजाबच्या सीमेवर दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 08:35 AM2018-10-29T08:35:09+5:302018-10-29T08:39:18+5:30
पंजाबच्या फिरोजपूर सीमेवरून रविवारी (28 ऑक्टोबर) सीमा सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. या दोघांकडे पाकिस्तानी सेनेची ओळखपत्रं मिळाली आहेत.
फिरोजपूर - पंजाबच्या फिरोजपूर सीमेवरून रविवारी (28 ऑक्टोबर) सीमा सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. या दोघांकडे पाकिस्तानी सेनेची ओळखपत्रं मिळाली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी चलन, दोन मोबाईल आणि सिम कार्डदेखील जप्त करण्यात आलं आहे. भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना सीमा सुरक्षा दलांनी ही कारवाई केली.
Punjab: Operation party of Border Out Post Dona Telu Mal apprehended 2 Pakistani nationals in Firozpur who were approaching to the Indian side around 5.10 pm earlier today. 2 IDs of Pakistan Army, cash, 1 Pakistani SIM card, 4 photographs and 2 mobile phones seized from them. pic.twitter.com/4qH6JMuA7g
— ANI (@ANI) October 28, 2018
फिरोजपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाचे जवान गस्तीसाठी गेले होते. त्याचवेळी साधारण पाच वाजता भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेले दोन जण सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिसले. जवानांनी त्यांना घेराव घातला तसेच त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. कोणत्या कारणांसाठी भारतात येण्याचा प्रयत्न करत होते? याची चौकशी सीमा सुरक्षा दलातर्फे केली जाते आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.