काय सांगता? पोलीस ठाण्यात चक्क पोपटांनी साक्ष दिली अन् निर्णयही झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 04:17 PM2020-05-31T16:17:05+5:302020-05-31T16:27:17+5:30
पोलीस ठाण्यात चक्क पोपटानं साक्ष दिली असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. पोपटांची ही साक्ष महत्त्वाची ठरली असून त्यानंतर निर्णयही झाल्याची घटना समोर आली आहे.
जयपूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान अनेक अजब घटना समोर येत आहेत. अनेक जण आपल्या समस्या सोडवण्यासाठी अथवा तक्रारींसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतात. मात्र याच दरम्यान पोलीस ठाण्यात चक्क पोपटांनी साक्ष दिली असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. पोपटांची ही साक्ष महत्त्वाची ठरली असून त्यानंतर निर्णयही झाल्याची घटना समोर आली आहे.
राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात ही अजब घटना घडली आहे. एका लहान मुलाने दोन पोपट पाळले होते. लॉकडाऊनमध्ये ते दोन्ही पोपट उडून गेले होते. काही दिवसांनी लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर घरच्यांनी पोपटांचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा एका महिलेने दोन्ही पोपट पकडून पिंजऱ्यात ठेवल्याचं समोर आलं. मुलाने महिलेकडे पोपट परत करण्याची विनंती केली तर तिने नकार दिला. त्यानंतर चिमुकल्याने पोपटांसाठी थेट पोलिसांकडे धाव घेतली.
CoronaVirus News : संतापजनक! विंचू सापडल्याने खळबळ; प्रशासनाचा भोंगळ कारभारhttps://t.co/vBwxG9lD6k#CoronaUpdatesInIndia#coronavirusinindia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, करण सेन असं मुलाचं नाव आहे. तो राजसमंद जिल्ह्यातील कुंवारिया गावचा रहिवासी आहे. त्याने दोन पोपट पाळले होते. एकाचं नाव होतं राधा तर दुसऱ्याचं होतं कृष्ण. लॉकडाऊनमध्ये एक दिवस हे दोन्ही पोपट उडून गेले. मात्र त्यावेळी त्यांचा शोध घेता आला नाही. नियम थोडे शिथिल केले तेव्हा घरच्या लोकांनी बाहेर शोध घेतला. दोन्ही पोपट एका महिलेने पकडल्याचं समजलं. तेव्हा पोपट परत द्या अशी महिलेला विनंती करण्यात आली पण तिने यासाठी नकार दिला.
CoronaVirus News : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 'या' ठिकाणी लढवण्यात आली अनोखी शक्कलhttps://t.co/rjjwhTowSP#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2020
करणने रडत रडत पोलिस ठाणे गाठले आणि एका महिलेने त्याचे दोन पोपट पकडले असल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी महिलेला दोन्ही पोपटांसह पोलीस ठाण्यात बोलावलं. त्यानंतर पोपट कोणाचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी पोपटांनीच त्यांचा मालक कोण याची साक्ष पोलिसांसमोर दिल्याची माहिती मिळते. करणने जेव्हा राधा कृष्ण अशी हाक मारली तेव्हा दोन्ही पोपट उडून त्याच्या खांद्यावर येऊन बसले. यावरूनच पोलिसांनी दोन्ही पोपट करणचे असून ते त्याला परत करावेत असं पोलिसांनी महिलेला सांगितलं. त्यानंतर महिलेने ते पोपट परत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! चिंता वाढवणारी आकडेवारीhttps://t.co/16eDMSj7CA#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : भयंकर! जेवणात आढळला विंचू; क्वारंटाईन सेंटरमधील धक्कादायक प्रकार
अमेरिकेत हिंसाचार सुरू; तब्बल 1400 जणांना अटक
"मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती"
CoronaVirus News : खरंच की काय? हाताने नाही तर आता पायाने चालणार लिफ्ट; पाहा Video
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने मोडला रेकॉर्ड, गाठला नवा उच्चांक
CoronaVirus News : 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरात मोठी तफावत'; ICMR ने WHO ला लिहिलं पत्र
CoronaVirus News : कुटुंबातील 'या' कोरोना योद्ध्याचा रोहित पवारांनी केला खास सन्मान