अण्णा द्रमुकचे दोन्ही गट होणार विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:46 AM2017-08-12T01:46:18+5:302017-08-12T01:46:21+5:30
जयललितांच्या निधनानंतर दोन गटांत दुभंगलेल्या अण्णा द्रमुकमध्ये पुन्हा विलीनीकरणाचे वारे वाहू लागले असून, तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम हे दोन्ही गटांचे नेते दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत.
चेन्नई/नवी दिल्ली : जयललितांच्या निधनानंतर दोन गटांत दुभंगलेल्या अण्णा द्रमुकमध्ये पुन्हा विलीनीकरणाचे वारे वाहू लागले असून, तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम हे दोन्ही गटांचे नेते दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत. पलानास्वामी यांनी ‘नीट’ परीक्षेच्या मुद्द्याच्या आडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
शशिकला आणि त्यांच्या कुटुंबातील कोणाला पक्षात स्थान असता कामा नये, अशी अट पन्नीरसेल्वम गटाने ठेवली आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत दिनकरन यांची या पदावरील नियुक्ती बेकायदा असल्याचा ठरावच संमत करण्यात आला. शशिकला सध्या काम करण्यास सक्षम नाहीत, असेही मत व्यक्त झाले.
पन्नीरसेल्वम गटाने जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशा अटी घातल्या आहेत. दिनकरन हे शशिकला यांचे पुतणे आहेत, तर शशिकला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
पक्षाच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण १५ आॅगस्ट रोजी होणार असल्याची चर्चा आहे.
दिनकरन यांचा सवाल
पलानीस्वामी यांच्या गटाने माझ्या नियुक्तीला आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. मला अद्रमुकमधून कोणीही काढू शकत नाही. शशिकला यांनी नियुक्तकेलेले सर्व जण काम करीत आहेत. मग मी का करू शकत नाही, असा सवाल दिनकरन यांनी उपस्थित केला आहे.