उष्माघाताचे शहरात दोन बळी

By admin | Published: May 21, 2016 12:06 AM2016-05-21T00:06:25+5:302016-05-21T00:06:25+5:30

जळगाव: जिल्‘ात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. या वाढत्या तापमानाने गुरुवारी व शुक्रवारी मध्यरात्री दोन जणांचा बळी घेतला आहे. मनोज रामचंद्र भादलीकर (वय ४० रा.शिवराणा नगर, गुजराल पेट्रोल पंपाजवळ, जळगाव) यांचा रात्री एक वाजता तर सुनील शालिग्राम वाणी (वय ४२ रा.रामेश्वर कॉलनी) यांचा गुरुवारी संध्याकाळी सात वाजता मृत्यू झाला.

Two people in the city of heat stroke | उष्माघाताचे शहरात दोन बळी

उष्माघाताचे शहरात दोन बळी

Next
गाव: जिल्‘ात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. या वाढत्या तापमानाने गुरुवारी व शुक्रवारी मध्यरात्री दोन जणांचा बळी घेतला आहे. मनोज रामचंद्र भादलीकर (वय ४० रा.शिवराणा नगर, गुजराल पेट्रोल पंपाजवळ, जळगाव) यांचा रात्री एक वाजता तर सुनील शालिग्राम वाणी (वय ४२ रा.रामेश्वर कॉलनी) यांचा गुरुवारी संध्याकाळी सात वाजता मृत्यू झाला.
भादलीकर हे नवभारत या वृत्तपत्रात मार्केटिंग विभागात कामाला होते. गुरुवारी दिवसभर ड्युटी केल्यानंतर संध्याकाळी ते घरी गेले. रात्री साडे बारा वाजता त्यांना अचानक रक्तदाब कमी होऊन मळमळ व उलट्यांचा त्रास होऊ लागला. यावेळी खासगी डॉक्टरांना घरी बोलावण्यात आले होते. त्यांनी प्राथमिक उपचार केले, मात्र शरीरातील पाणी कमी झाल्याने काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. दिवसा उन्हाचा फटका बसल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
भादलीकर हे अजातशत्रू व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मित्र परिवाराने त्यांचे घर गाठून परिवाराचे सांत्वन केले. त्यांच्या प›ात पत्नी, आई, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांची परिस्थितीत साधारणच होती. ते घरातील एकमेव कर्ते व्यक्ती होते.
वाणींचा मृतदेहच आढळला
सुनील वाणी यांचा मृतदेह गुरुवारी संध्याकाळी काशिनाथ लॉज परिसरात आढळून आला होता.त्यांना दारुचेही व्यसन होते. उन्हाचा फटका बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वाणी हे अविवाहित होते. भाऊ भास्कर वाणी यांच्यात ते राहत होते.दरम्यान, दोघांवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Two people in the city of heat stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.