सुभाष चौकात दगडफेक दोन जण ताब्यात : पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण

By admin | Published: April 1, 2016 10:54 PM2016-04-01T22:54:10+5:302016-04-01T22:54:10+5:30

जळगाव: अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा सुभाष चौकात हॉकर्सधारकांनी दुकाने मांडल्याने ते काढण्यासाठी गेलेल्या मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांवर काही जणांनी दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घडली. दगडफेकीमुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. दरम्यान, दगडफेक केल्याप्रकरणी शहर हॉकर्स सेनेचे प्रमुख बाळू बाविस्कर व छायाबाई आनंदा भोई या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Two people were arrested in the suburb of Subhash Chowk: encroachment was removed in police custody | सुभाष चौकात दगडफेक दोन जण ताब्यात : पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण

सुभाष चौकात दगडफेक दोन जण ताब्यात : पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण

Next
गाव: अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा सुभाष चौकात हॉकर्सधारकांनी दुकाने मांडल्याने ते काढण्यासाठी गेलेल्या मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांवर काही जणांनी दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घडली. दगडफेकीमुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. दरम्यान, दगडफेक केल्याप्रकरणी शहर हॉकर्स सेनेचे प्रमुख बाळू बाविस्कर व छायाबाई आनंदा भोई या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सुभाष चौकातील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर त्यांचे नवीन व जुने बी.जे.मार्केटमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. यात काही हॉकर्सना अद्यापही जागा मिळाली नसल्याने हा घोळ कायम आहे, त्यामुळे शुक्रवारी आठ ते दहा जणांनी सुभाष चौकात आपली दुकाने मांडली होती. हॉकर्सनी पुन्हा अतिक्रमण केल्याचे समजल्याने मनपा अतिक्रमण विभागाचे एच.एम.खान, आरोग्य अधिकारी उदय पाटील व कर्मचार्‍यांनी सुभाष चौकात जाऊन हॉकर्स धारकांवर कारवाई केली.यात हातगाड्या व गासोडे ट्रकमध्ये टाकत असताना तीस ते चाळीस जणांच्या गटाकडून अतिक्रमण कर्मचार्‍यांवर दगडफेक केली.
किरकोळ मार लागला
या दगडफेकीत मनपाचा कॅमेरामन संजय वडनेरे व अन्य दोन जणांना किरकोळ मार लागला. दगडफेक होत असल्याची माहिती मिळताच शनी पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक आत्माराम प्रधान, शहरचे निरीक्षक नवलनाथ तांबे, सहायक निरीक्षक दीपक गंधाले व कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी आरसीपीचेही एक प्लाटून मागविण्यात आले होते. पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्याने दगडफेक करणार्‍यांनी तेथून पळ काढला.
दुचाकी सोडून पळाले...
वातावरण चिघडू नये म्हणून पोलिसांनी दगडफेक करणार्‍यांची धरपकड सुरू केल्याने पळापळ झाली. यात हॉकर्स सेनेचे शहर प्रमुख बाळू बाविस्कर व छायाबाई भोई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर काहीजण दुचाकी सोडून पळून गेले. वातावरण दुषीत करणार्‍या काही जणांना शहर व शनी पेठ पोलिसांनी कलम १४९च्या नोटिसा बजावल्या.
मालपुरेंची मध्यस्थी..
हॉकर्सचा वाद सामंजस्याने मिटवावा म्हणून शिवेसेनचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी घटनास्थळी येऊन मनपाचे एच.एम.खान, पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांच्याशी चर्चा केली.हॉकर्सधारकांची बाजू लावून धरत त्यांनी आयुक्त संजय कापडणीस यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. ताब्यात घेण्यात आलेल्या कोणावरही गुन्हा दाखल करु नये यासाठी त्यांनी आयुक्त व पोलिसांना विनंती केली. दरम्यान, याप्रकरणी चर्चेसाठी आयुक्तांनी मालपुरेंना मनपात पाचारण केले.

Web Title: Two people were arrested in the suburb of Subhash Chowk: encroachment was removed in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.