दोन विमान अपघात टळले; ५१७ प्रवाशांचा जीव वाचला
By admin | Published: December 28, 2016 04:54 AM2016-12-28T04:54:34+5:302016-12-28T04:54:34+5:30
दोन विमानतळांवर दोन मोठे विमान अपघात टळल्याने ५१७ प्रवाशांचा जीव वाचला. दिल्लीत दोन विमानांची टक्कर थोडक्यात टळली. गोव्यात जेटचे विमान धावपट्टीवरून
नवी दिल्ली/पणजी : दोन विमानतळांवर दोन मोठे विमान अपघात टळल्याने ५१७ प्रवाशांचा जीव वाचला. दिल्लीत दोन विमानांची टक्कर थोडक्यात टळली. गोव्यात जेटचे विमान धावपट्टीवरून घसरल्याने २० प्रवासी जखमी झाले आहेत.
पहाटे ५ वाजेच्या सुमारास दुबईहून गोवामार्गे मुंबईला जाणारे विमान गोव्यात दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते़ मुंबईला प्रस्थान करण्यास धावपट्टीवर येत असताना दाट धुक्यामुळे वैमानिकाला अंदाज न आल्याने ते धावपट्टीबाहेर गेले़ त्याचवेळी विमानाचे टायर फुटले. वैमानिकाने अचानक ब्रेक लावल्याने विमान वर्तुळाकार फिरले आणि पुढे जाऊन धडकले़ त्यात २० जण जखमी झाले़
- गोव्यात दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या जेट एअरवेजच्या अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली.
काहींनी केबिनच्या दारातून बाहेर पडण्यास गर्दी केल्याने विमान एका बाजूने झुकले़ ते कलंडताच प्रवासी आणखी घाबरले.
काहींनी मागील दरवाजातून बाहेर पडण्यास उड्या मारल्या़ काहींचे हात-पाय फ्रॅ क्चर झाले़. काहींना किरकोळ दुखापती झाल्या़ जखमींमध्ये गरोदर महिलेचा समावेश आहे़
नौदलाचे मदतकार्य
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत बचावकार्य सुरू केले. विमानात अडकलेल्या सर्व प्रवाशांना त्यांनी सुखरूपपणे बाहेर काढले़ १० प्रवाशांना चिखलीच्या सरकारी कुटीर रुग्णालयात, तर गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़
दिल्लीत संदेशवहनाची चूक
इंडिगो आणि स्पाइसजेट या खासगी कंपन्यांची विमाने दिल्ली विमानतळावर मंगळवारी सकाळी समोरासमोर आली.
मात्र, थोडक्यात मोठा अपघात टळला.
हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून चुकीच्या संदेशवहनामुळे या विमानांचा अपघात होताहोता टळला, असे सूत्रांनी सांगितले.
ही घटना घडली त्या वेळी लखनौहून आलेल्या इंडिगो विमानात १६० तर हैदराबादला निघालेल्या स्पाइसजेट
विमानात १८७ प्रवासी होते. या घटनेची चौकशी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने सुरू केली आहे.