दोन पोलीस कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2016 12:04 AM2016-01-26T00:04:43+5:302016-01-26T00:04:43+5:30

जळगाव : जिल्हा पोलीस दलातील राज्य गुप्तवार्ता विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र झेंडे व बॉम्ब शोधक पथकातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण पाटील यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे.

Two policemen receive the President's medal | दोन पोलीस कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक

दोन पोलीस कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक

Next
गाव : जिल्हा पोलीस दलातील राज्य गुप्तवार्ता विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र झेंडे व बॉम्ब शोधक पथकातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण पाटील यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे.
राजेंद्र झेंडे १९८१ साली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर भरती झाले. त्यांचे शिक्षण बी. ए. एलएलबी. झाले असून त्यांना चांगल्या कामगिरीबद्दल आतापर्यंत १५३ बक्षिसे मिळाली आहे. त्यांनी जिल्हा विशेष शाखा, जळगाव शहर व राज्य गुप्तवार्ता विभाग जळगाव, मनमाड, सटाणा, धुळे शहर व पिंपळनेर पोलिसात सेवा केली आहे.
अरुण पाटील सद्या बॉम्ब शोधक पथकाच्या साहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. ते १९८० साली पोलीस दलात भरती झाले. त्यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत झाले आहे. त्यांना चांगल्या कागगिरी बद्दल २०५ बक्षिसे मिळाली आहेत. त्यांनी जिल्‘ातील जामनेर,पहुर,जळगाव शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी या ठिकाणी सेवा बजावली आहे.
राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलीस उप अधीक्षक महारू पाटील, एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल, दत्तात्रय पाटील, उपनिरीक्षक ईश्वर सोनवणे यांनी अभिनंदन केले.

Web Title: Two policemen receive the President's medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.