भारतीय विद्यार्थ्यांनी चालता फिरता केलेला स्टंट पाहून ऑलिम्पिक विजेती म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 03:36 PM2019-08-31T15:36:13+5:302019-08-31T15:45:06+5:30
सध्या सोशल मीडियावर भारतील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा व्डिडिओ व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली: सध्या सोशल मीडियावर भारतील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा व्डिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी जिमनॅस्टींक सारखा स्टंट करताना दिसत आहे. विद्यार्थ्यांनी चालता फिरता स्टंटचा व्हिडिओ पाहून ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल पाचवेळा सुवर्णपदक जिंकणारी रोमानियाची नाडिया कोमेन्सी देखील या कसरती बघून प्रभावित झाली आहे.
रोमानियाची माजी जिमनॅस्ट नाडिया कोमेन्सीने ऑलिम्पिकमध्ये एकूण ५ सुवर्णपदकं पटकावली आहेत. तिने देखील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत 'हे अद्भूत आहे' असे म्हणत तिने आश्चर्य व्यक्त केले आहे.
This is awesome pic.twitter.com/G3MxCo0TzG
— Nadia Comaneci (@nadiacomaneci10) August 29, 2019
त्याचप्रमाणे भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करत या मुलांमध्ये खूप प्रतिभा असल्याचे सांगितल. त्याचप्रमाणे 'हा व्हिडिओ ट्विट नाडिया कोमेन्सीने केल्याचं पाहून मी आनंदीत झालो असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
I'm happy that @nadiacomaneci10 tweeted it! As first gymnast who scored perfect 10.0 at the 1976 Montreal Olympics, and then, received six more perfect 10s to win three gold medals, it becomes very special. I've urged to introduce these kids to me. https://t.co/ahYVws8VCB
— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 30, 2019