बैल घेण्यास पैसे नसल्याने दोन बहिणींनी केली नांगरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:22 AM2018-07-02T01:22:05+5:302018-07-02T01:22:52+5:30

सरकारने कर्जमाफी, स्पेशल पॅकेजेस जाहीर होऊनही शेतकऱ्याच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही याचे विदारक उदाहरण समोर आले आहे.

 Two sisters have plowed the plow, because there is no money to buy the bull | बैल घेण्यास पैसे नसल्याने दोन बहिणींनी केली नांगरणी

बैल घेण्यास पैसे नसल्याने दोन बहिणींनी केली नांगरणी

googlenewsNext

लखनौ : सरकारने कर्जमाफी, स्पेशल पॅकेजेस जाहीर होऊनही शेतकऱ्याच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही याचे विदारक उदाहरण समोर आले आहे.
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातल्या बडगावामध्ये गरीबीने गांजलेल्या अचेयलाल अहरवार या ६० वर्षीय शेतक-याकडे नांगरणीसाठी ना ट्रॅक्टर आहे ना बैलांची जोडी. त्यामुळे अचेयलालच्या साथीने त्याच्या दोन अल्पवयीन मुलींनीच नांगराला जुंपून घेऊन आपल्या शेतात नांगरणी केली.

पावसाकडे लागले डोळे
अचेयलाल याला रविना (१३ वर्षे) व शिवानी (१० वर्षे) या दोन मुली आहेत. रविना इयत्ता आठवीत तर शिवानी सातवीत शिकत आहे. सध्या दोघींच्या शाळांना सुट्टी आहे. अचेयलालने सांगितले की, तिळाचे उत्पादन घेण्याचा यंदा विचार आहे. मात्र त्यासाठी चांगला पाऊस पडायला हवा. ट्रॅक्टर किंवा बैलाची जोडी भाड्याने घेऊन नांगरणी करण्याइतकी चांगली परिस्थिती नसल्यामुळे मी व माझ्या मुलींनी मिळून जमिनीची नांगरणी करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय आमच्याकडे काही पर्यायही नव्हता असेही अचेयलाल म्हणाला.

हवे आहे लाल रंगाचे रेशनकार्ड
बडगावमधील एका मातीच्या घरात राहाणाºया अचेयलालला एकुण सहा मुली आहेत. त्यापैकी चार मुलींचा विवाह झाला आहे. सध्या तो, त्याची पत्नी व दोन मुली असा परिवार या घरात राहातो. त्याच्याकडे पांढºया रंगाचे रेशनकार्ड आहे. त्यावर त्याला प्रत्येक व्यक्तिमागे ५ किलो या हिशेबाने दर महिन्याला २० किलो धान्य मिळते. आपल्याला लाल रंगाचे रेशनकार्ड द्यावे यासाठी त्याने सरकार दरबारी अर्ज केला आहे. या शिधावाटप पत्रामुळे त्याला सरकारी गृहयोजना, शौचालयासंदर्भातील योजनेचाही लाभ घेता येईल.

Web Title:  Two sisters have plowed the plow, because there is no money to buy the bull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी