जम्मू-काश्मिरातील किश्तवाड येथे दहशतवाद्यांसोबत चकमक, दोन जवानांना हौतात्म्य, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 12:34 AM2024-09-14T00:34:52+5:302024-09-14T00:35:48+5:30
किश्तवाड मधील ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी घडली आहे...
जम्मू-काश्मिरातील किश्तवाड जिल्ह्यातील चटरू भागात शुक्रवारी (13 सप्टेंबर) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवानांना होतात्म आले. तर दोन जण जखमी झाले आहेत. नगरोटा येथील व्हाइट नाइट कोरने दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत भारतीय सैन्य दलातील चार जवान जखमी जाले आहेत. तर, सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जखमी जवानांना चटरू रुग्णालयात घेऊन जात असताना दोघांचा मृत्यू झाला आहे.
नायब सुबेदार विपण कुमार आणि कॉन्स्टेबल अरविंद सिंह अशी हौतात्म्य आलेल्या जवानांची नावे असल्याचे समजते. व्हाइट नाइट कोरने एक्सवर एक पोस्ट करत होतात्म आलेल्या जवानांच्य कुटुंबीयां प्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनसुरा, गुप्त माहितीच्या आधारे, सुरक्षा दलांनी छतरू भागातील नैदघाम परिसरात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन जवान जखमी देखील झाले आहेत.
#IndianArmy#GOC White Knight Corps and all ranks salute the supreme sacrifice of the #Bravehearts; offer deepest condolences to the families. @NorthernComd_IA@adgpi@SpokespersonMoDpic.twitter.com/MRV4CLBTWE
— White Knight Corps (@Whiteknight_IA) September 13, 2024
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी हल्ला -
किश्तवाड मधील ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी घडली आहे. खरे तर, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडक होत आहे. येथे 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (14 सप्टेंबर) डोडा मध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत.