सुप्रीम कोर्टाच्या दोन कर्मचाऱ्यांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 06:55 AM2019-04-09T06:55:10+5:302019-04-09T06:55:26+5:30
अनिल अंबानींचे प्रकरण : न्यायालयाच्या वेबसाईटवर चुकीचा आदेश अपलोड
नवी दिल्ली : रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर कथित स्वरूपात चुकीची माहिती टाकल्याच्या आरोपात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सूत्रांनी सांगितले की, वेबसाइटवर कथित स्वरूपात एक आदेश अपलोड करण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकरणात अंबानी यांना उपस्थितीपासून सूट देण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाने आदेश दिला होता की, पुढील सुनाावणीस उपस्थित राहावे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत टिप्पणी करण्यास नकार दिला. सूत्रांनी सांगितले की, आरोपी मानव आणि तपन यांना रविवारी अटक करण्यात आली आहे. त्यापूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दोघांनाही बरखास्त केले होते. दोघांची चौकशी केली जात आहे.
न्यायालयाचा
अवमान
रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी हजर राहण्याबाबतच्या मुद्यावर ७ जानेवारीच्या आदेशात छेडछाड केल्याप्रकरणी या दोन्ही अधिकाºयांना बरखास्त करण्यात आले आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एरिक्सन कंपनीची थकीत रक्कम न भरल्याप्रकरणी न्या. आर. एफ. नरीमन यांच्या नेतृत्वातील खंडपीठ सुनावणी करीत आहे.