पाकिस्तानसाठी हेरगिरी करणा-या दोन संशयितांना गुजरातमध्ये अटक

By Admin | Published: October 13, 2016 10:28 AM2016-10-13T10:28:21+5:302016-10-13T10:28:21+5:30

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून आयएसआयसाठी काम करणा-या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Two suspects arrested for spying in Pakistan are arrested in Gujarat | पाकिस्तानसाठी हेरगिरी करणा-या दोन संशयितांना गुजरातमध्ये अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणा-या दोन संशयितांना गुजरातमध्ये अटक

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

कच्छ, दि. १३ - भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असताना गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून आयएसआयसाठी काम करणा-या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. 
 
आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा  आहे. कच्छ जिल्ह्याची सीमा पाकिस्तानला लागून आहे. कच्छच्या खावडा गावात रहाणा-या दोन संशयितांच्या हालचालींवर एटीएसचे अधिकारी मागच्या वर्षभरापासून पाळत ठेवून होते. अखेर त्यांना बुधवारी अटक करण्यात आली. एटीएसने त्यांच्या घरातून एक पाकिस्तानी सीम कार्ड आणि मोबाईल जप्त केला आहे. 
 

Web Title: Two suspects arrested for spying in Pakistan are arrested in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.