संशयितांच्या शोधार्थ पोलिसांचे दोन पथके जिल्हा बॅँक प्रकरण : पारोळा, धरणगाव, पाळधी येथे घेतला शोध

By Admin | Published: April 22, 2016 11:21 PM2016-04-22T23:21:51+5:302016-04-22T23:21:51+5:30

जळगाव : जिल्हा बॅँकेची फसवणूक व अपहार प्रकरणी दाखल गुन्‘ात संशयित आरोपींच्या शोधार्थ दोन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाने शुक्रवारी पहाटेपर्यंत पारोळा, जळगाव, धरणगाव व पाळधी येथे शोध घेतला, मात्र एकही जण मिळून आला नाही शुक्रवारीही एका पथकाने दिवसभर गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतल्याचे तपासाधिकारी श्याम तरवाडकर यांनी पत्रकारांना सांगितले.

Two teams of police in search of the suspects: District bank: Parola, Dharangaon, Paldi | संशयितांच्या शोधार्थ पोलिसांचे दोन पथके जिल्हा बॅँक प्रकरण : पारोळा, धरणगाव, पाळधी येथे घेतला शोध

संशयितांच्या शोधार्थ पोलिसांचे दोन पथके जिल्हा बॅँक प्रकरण : पारोळा, धरणगाव, पाळधी येथे घेतला शोध

googlenewsNext
गाव : जिल्हा बॅँकेची फसवणूक व अपहार प्रकरणी दाखल गुन्‘ात संशयित आरोपींच्या शोधार्थ दोन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाने शुक्रवारी पहाटेपर्यंत पारोळा, जळगाव, धरणगाव व पाळधी येथे शोध घेतला, मात्र एकही जण मिळून आला नाही शुक्रवारीही एका पथकाने दिवसभर गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतल्याचे तपासाधिकारी श्याम तरवाडकर यांनी पत्रकारांना सांगितले.
जे.टी.महाजन सूतगिरणी (यावल) खरेदीसाठी लक्ष्मी टेक्सटाईल्सला (धरणगाव) निविदेद्वारे भरलेली दोन कोटी ७९ लाख २८ हजार ७५० रुपये ही २५ टक्के रक्कम नियमबा‘ परत करुन जिल्हा बॅँकेची फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी बॅँकेचे तत्कालीन चेअरमन व विद्यमान आमदार सतीश भास्करराव पाटील, सुतगिरणीवर बॅँकेचे प्राधिकृत अधिकारी एस.झेड.पाटील, जळगाव बाजार समितीचे सभापती प्रकाश आनंदा नारखेडे, संचालक लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर, धरणगावचे नगराध्यक्ष सुरेश सीताराम चौधरी, अनिल बन्सीलाल सोमाणी, नयनकुमार चिमणलाल सराफ व भिकन काशीनाथ माळी आदी आठ जणांविरुध्द ॲड.विजय भास्कर पाटील यांच्या फिर्यादीवरुन मंगळवारी रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कागदपत्रांचा पंचनामा करणार
या गुन्‘ाशी निगडित काही फाईली व कागदपत्रे मागवली असून बॅँकेने दोन दिवसाची मुदत मागितली आहे. त्यानंतर कागदपत्रांचा पंचनामा करुन ते ताब्यात घेण्यात येतील, असे तरवाडकर म्हणाले. पारोळा येथे तेथील पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे हे रात्री आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या शोधासाठी गेले होते, तर आपण स्वत: धरणगाव व पाळधी येथे गेलो होतो असे तरवाडकर यांनी सांगितले. उपनिरीक्षक गिरधर यांचे एक पथक अद्यापही बाहेर आहे.

Web Title: Two teams of police in search of the suspects: District bank: Parola, Dharangaon, Paldi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.