पाकिस्तानात दोन अतिरेक्यांना फाशी....
By Admin | Published: December 20, 2014 10:28 PM2014-12-20T22:28:18+5:302014-12-20T22:28:18+5:30
दोन अतिरेक्यांना फाशी, १९ डिसेंबर २०१४
द न अतिरेक्यांना फाशी, १९ डिसेंबर २०१४पाकिस्तानात दोन अतिरेक्यांना फाशीइस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने फाशीच्या शिक्षेवरील बंदी मागे घेतल्याच्या दुसर्याच दिवशी शुक्रवारी रात्री दोन अतिरेक्यांना फासावर लटकविण्यात आले. लष्कराच्या मुख्यालयावर आणि माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.पहिल्या टप्प्यात १७ अतिरेक्यांना फाशी दिली जाणार आहे. पेशावरमधील लष्करी शाळेवरील भयंकर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी फाशीच्या शिक्षेवरील बंदी मागे घेतली होती. रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयावरील हल्ल्यादरम्यान अकील ऊर्फ डॉ. उस्मान जखमी झाला होता. त्याला जिवंत पकडण्यात आले होते, तर दुसरा अतिरेकी अर्शद मेहमूद (मेहरबान) याला जन. मुशर्रफ यांच्यावरील हल्ल्यात मृत्युदंड सुनावण्यात आला होता. जिओ आणि दुनिया टीव्हीसह पाकिस्तानमधील मुख्य खाजगी टीव्ही चॅनल्सनी या दोघांना शुक्रवारी रात्री ९ वाजता (स्थानिक वेळ) फैसलाबाद तुरुंगात फाशी देण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. लष्करप्रमुख जन. राहिल शरीफ यांनी गुरुवारी रात्रीच सशस्त्र दलविरोधी दहशतवादी कारवायातील सहा जणांना फासावर लटकविण्याच्या फतव्यावर स्वाक्षरी केली होती.२००३ मध्ये जन. मुशर्रफ यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी पाच जणांना मृत्युदंड सुनावण्यात आला होता. यात मेहमूदचाही समावेश होता. या हल्ल्यात १५ जण ठार झाले होते. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या अतिरेक्यांना येत्या काही दिवसांत फाशी दिली जाणार आहे. कोट लखपत जेलमधील चार अतिरेक्यांना शनिवारी फाशी दिली जाण्याची शक्यता आहे.