लखनऊमध्ये अद्याप दोन दहशतवादी लपले आहेत - पोलीस

By admin | Published: March 7, 2017 11:37 PM2017-03-07T23:37:27+5:302017-03-07T23:51:07+5:30

ठाकूरगंज परिसरातील हाजी कॉलनीमध्ये दोन संशयित इसिसचे दहशतवादी अद्याप लपून बसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Two terrorists are still in Lucknow - the police | लखनऊमध्ये अद्याप दोन दहशतवादी लपले आहेत - पोलीस

लखनऊमध्ये अद्याप दोन दहशतवादी लपले आहेत - पोलीस

Next

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 7 - येथील ठाकूरगंज परिसरातील हाजी कॉलनीमध्ये दोन संशयित इसिसचे दहशतवादी अद्याप लपून बसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी गेल्या पाच तासांपासून याठिकाणी पोलिसांसह एटीएसचे पथक आणि दहशतवादी यांच्यात अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. मात्र, अद्याप एकाही दहशतवाद्याला पकडण्यात यश आले नसल्याचे समजते. दहशतवाद्यांना जिवंत पकडण्याच्या उद्देशाने पोलिसांचे ऑपरेशन सुरू आहे.

अद्याप या ठिकाणी ऑपरेशन सुरू आहे. आम्हाला सुरुवातीला या ठिकाणी एक जण असल्याचे समजले. मात्र आता दोघे जण असल्याचे समोर येत असल्याचे अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) दलजित चौधरी यांनी अशी माहिती एएनआयला दिली आहे. तसेच खबरदारी म्हणून ऑपरेशन संपेपर्यंत स्थानिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, संशयित दहशतवादी इसिस या दहशतवादी संघटनेचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असून या दहशवाद्यांचा मध्य प्रदेशातील ट्रेन स्फोटाशी संबंध असल्याचेही बोलले जात आहे.

Web Title: Two terrorists are still in Lucknow - the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.