अनंतनाग येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 17:45 IST2019-05-28T17:16:39+5:302019-05-28T17:45:15+5:30
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे.

अनंतनाग येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
अनंतनाग (जम्मू-काश्मीर) - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. ठार करण्यात आलेले दहशतवादी हे हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून, परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे.
अनंतनागमधील कोकेरनाग परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसाल घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. यदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर चकमकीस सुरुवात झाली.
सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यादरम्यान दोन दहशतवादी ठार झाले. या कारवाईमध्ये जम्मू काश्मीर पोलीस, 19 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफचे जवान सहभागी झाले होते. दरम्यान, लष्कराने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून, शोधमोहीम सुरू आहे.
#UPDATE: Two terrorists have been neutralised by security forces in the encounter in Anantnag #JammuAndKashmirhttps://t.co/zcTj5uUOzP
— ANI (@ANI) May 28, 2019