काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचे २ दहशतवादी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2016 09:03 AM2016-04-07T09:03:28+5:302016-04-07T09:06:33+5:30

जम्मू-काश्मीरच्या शोपियां भागात दहशतवादी व सुरक्षा दलाच्या जवानांदरम्यान झालेल्या चकमकीदरम्यान हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले

Two terrorists of Hizbul Mujahideen killed in Kashmir | काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचे २ दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचे २ दहशतवादी ठार

Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ७ - जम्मू-काश्मीरच्या शोपियां भागात दहशतवादी व सुरक्षा दलाच्या जवानांदरम्यान झालेल्या चकमकीदरम्यान हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. आज पहाटेपासून शोपियां येथे ही चकमक सुरू आहे. 
शोपियां भागात काही दहशतवादी घुसल्याची खबर जवानांना मिळताच कालपासूनच शोधमोहिम सुरू होती, त्यादरम्यानच दहशतवाद्यांनी जवानावंर हल्ला केला. जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला आणि दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 
दरम्यान त्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून नसिर-अह-पंडित आणि वसिम-अह-मल्ला अशी त्यांची नावे आहेत. 
 
 

Web Title: Two terrorists of Hizbul Mujahideen killed in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.