श्रीनगरमध्ये दोन अतिरेकी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 05:05 AM2018-10-25T05:05:39+5:302018-10-25T05:05:58+5:30

श्रीनगरच्या नौगाम भागात बुधवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

Two terrorists killed in Srinagar | श्रीनगरमध्ये दोन अतिरेकी ठार

श्रीनगरमध्ये दोन अतिरेकी ठार

Next

श्रीनगर : श्रीनगरच्या नौगाम भागात बुधवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. नौगामच्या सुथू भागात आज सकाळी ही चकमक उडाली. या चकमकीनंतर त्या भागात जाण्यास लोकांना मज्जाव करण्यात आल्याने तिथे तणाव निर्माण झाला होता.
सुथू भागात तो अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळताच केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी त्यांचा शोध सुरू केला होता. त्यावेळी प्रथम दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत, हे जवानांच्या लक्षात आले आणि त्यांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यात दोघेही मरण पावले. तीन दिवसांपूर्वी तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर तेथील दारूगोळा नष्ट करण्याचे राहून गेले होते. त्या दारूगोळ्याचा स्फोट झाल्याने सात नागरिक मारले गेले होते. त्यामुळे आजच्या चकमकीनंतरही तिथे स्फोटके असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी लोकांना तिथे जाण्यास मज्जाव केला. संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. (वृत्तसंस्था)

Web Title: Two terrorists killed in Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.