पीओकेमधील निर्वासितांना दोन हजार कोटी

By admin | Published: August 29, 2016 02:37 AM2016-08-29T02:37:20+5:302016-08-29T02:37:20+5:30

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधून निर्वासित झालेल्या व भारतात राहणाऱ्या लोकांसाठी सरकार दोन हजार कोटी रुपयांची योजना जाहीर करणार आहे.

Two thousand crores of refugees in PoK | पीओकेमधील निर्वासितांना दोन हजार कोटी

पीओकेमधील निर्वासितांना दोन हजार कोटी

Next

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधून निर्वासित झालेल्या व भारतात राहणाऱ्या लोकांसाठी सरकार दोन हजार कोटी रुपयांची योजना जाहीर करणार आहे. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची महिनाभरात मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. जम्मू आणि काश्मीर सरकारने आधीच अशी ३६,३४८ निर्वासित कुटुंबे असल्याचे शोधले आहे. या कुटुंबांना प्रत्येकी ५.५ लाख रुपये या योजनेतून दिले जातील. महिनाभरात या योजनेला मंजुरी मिळेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. प्रामुख्याने पश्चिम पाकिस्तानातील (बहुतेक पाकव्याप्त काश्मीर) निर्वासित जम्मू, कथुआ आणि राजौरी जिल्ह्यांत वास्तव्यास आहेत. 

Web Title: Two thousand crores of refugees in PoK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.