वर्षभरात दोन हजार किमी रेल्वेमार्ग

By Admin | Published: November 6, 2015 01:00 AM2015-11-06T01:00:51+5:302015-11-06T01:00:51+5:30

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आर्थिक डबघाईस आलेल्या रेल्वेचे गाडे रुळावर आणण्याचे मोठे आव्हान पेलण्याच्या दिशेने उपाययोजना चालविल्या आहेत. त्यांना सुधारणांच्या

Two thousand km railroad in a year | वर्षभरात दोन हजार किमी रेल्वेमार्ग

वर्षभरात दोन हजार किमी रेल्वेमार्ग

googlenewsNext

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आर्थिक डबघाईस आलेल्या रेल्वेचे गाडे रुळावर आणण्याचे मोठे आव्हान पेलण्याच्या दिशेने उपाययोजना चालविल्या आहेत. त्यांना सुधारणांच्या ‘बुलेट ट्रेन’ला गती देण्यासाठी बरीच मजल गाठायची आहे. प्रवासाच्या सुविधांमध्ये वाढ ते रेल्वेमार्गांचा विस्तार अशा विविध आघाड्यांवर घेण्यात आलेल्या रेल्वेच्या कामगिरीचा आढावा असा आहे.

अर्थसंकल्पातील पथदर्शक पावले...
मध्यम काळातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ८.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचा ‘मास्टर प्लॅन’. योजना आराखड्यात एक लाख कोटींपेक्षा जास्त वाढ. तरतुदीत यापूर्र्वीपेक्षा ५२ टक्क्यांनी वाढ. प्रथमच एलआयसीकडून कमी दरातील दीर्घ मुदतीचा संस्थात्मक निधी.(पाच वर्षांसाठी १.५ लाख कोटींचा आराखडा) दुहेरीकरण, तिहेरीकरण, विद्युतीकरण, वाहतूक सेवेसाठी निधीची क्षमता वाढविली.
दुहेरीकरणाचे आजवरचे सर्वात मोठे १२०० कि.मी. चे लक्ष्य. रेल्वेमार्गाची एकूण लांबी २५०० कि.मी. विद्युतीकरणाचे सर्वात मोठे लक्ष्य-१६०० कि.मी. ८४ अर्थसंकल्पीय घोषणांची यापूर्वीच अंमलबजावणी. त्यात असंख्य माहिती- तंत्रज्ञान (आयटी) आणि प्रवासी सुविधांचा समावेश. यापैकी काही सुविधा अशा आहेत : सर्वांसाठी हेल्पलाईन- १३८,१२८, बिगर वातानुकूलित डब्यांमध्ये कचरापेट्या बसविणे, ई-कॅटरिंग, आरक्षण क्षमता वाढविण्याचा प्रयत्न. रेल्वे रद्द झाल्यास, परताव्यासंबंधी नियम अधिक मुक्त. मोबाइल- तिकीट, पाण्याचे वेंडिंग मशिन्स, ११ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा.

२०१५-१६ या वर्षातील आजवरच्या उपलब्धी...
आॅगस्टपर्यंत योजना खर्चासाठी २७ हजार कोटी रुपये यापूर्वीच खर्च. जपानच्या ओडीएच्या माध्यमातून वेस्टर्न डीएफसी प्रकल्पात २०० इंजिनच्या (९ हजार अश्वशक्ती) उत्पादनासाठी पाच हजार कोटी रुपयांचा खर्च. रेवाडी येथे देखभाल सुविधा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण. ३० जून २०१५ रोजी त्याबाबत निविदा जारी. आरएफपीसाठी पाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची निवड. भारतात होणार रेल्वेच्या संचाचे उत्पादन.

490
कि.मी.चा ब्रॉडगेज नेटवर्क
विस्तार, त्यात १६९ कि.मी. चे नवे मार्ग, १२२ कि.मी. जीसी आणि १९९ मार्गाचे दुहेरीकरण. दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेला आग्रा- इटावा नवा रेल्वेमार्ग (१०८ कि.मी.) कार्यान्वित. लोहारू-सिकार जीसी (१२२ कि.मी.) कार्यान्वित.

डाल्लीराजहरा- डोंडी (१७ कि.मी.) या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात नवा रेल्वेमार्ग कार्यान्वित. टुना बंदराला रेल्वेमार्गाची जोडणी. रेल्वेच्या चाकांचा निर्मिती प्रकल्प बेला येथे कार्यान्वित आॅगस्ट २०१४ पासून नियमित उत्पादन सुरू. चेन्नईत नोव्हेंबर २०१४ मध्ये एलएचबी डब्यांचा दुसरा कारखाना सुरू. जानेवारी २०१५ मध्ये हल्दिया येथे डेमू कारखाना सुरू. एलएचबी डब्यांच्या चौकटींचा कारखाना मार्च २०१५ मध्ये कार्यान्वित. एकूण २४,४५७ जैव- शौचालयांचा समावेश.(एप्रिल ते आॅगस्ट २०१५ मध्ये ४७११ जैव शौचालये.)

दिब्रुगड राजधानी एक्स्प्रेसमध्ये चाचणीसाठी जगातील पहिले बायो-कम- व्हॅकूम शौचालये बसविण्यात आले. देशांतर्गत भांडवलातून ३१८ नव्या आॅटो-कार वॅगनची क्षमता वाढविली. नव्या डिझाइनच्या स्टील कॉइल वॅगनचा विकास. कोळसा वाहून नेण्यासाठी देशी बनावटीची २५ टन अ‍ॅक्सल लोड वॅगन विकसित.

महत्त्वपूर्ण मार्ग आणि जोडणी...

1983
कि.मी. लांब आजवरचे सर्वाधिक कार्यान्वित रेल्वेमार्ग (७२३ कि.मी. दुहेरी मार्ग)
1375
आरकेएमचे सर्वाधिक विद्युतीकरण. अंमलबजावणीचे प्रमाण ९१.२ टक्के. सात वर्षांत प्रथमच मोठी उपलब्धी.

उधमपूर- कटरा, दुधनोई- मेंढपठार, मेघालयमधील पहिली रेल्वेलिंक.

लुमडिंग- बदरपूर- सिलचर-रुंदीकरण- बराक खोरे.

झारखंडमधील कोडेर्मा- हजारीबाग- नक्षलग्रस्त जिल्हा.
भिंड- इटावा मार्ग पूर्ण. गुना- ग्वाल्हेर- इटावा रेल्वेमार्ग कासगंज- बरेली, ब्रॉडगेज.

2015-16
या वर्षाच्या अर्थसंकल्पात ७७ क्षमता विस्तार प्रकल्पांचा समावेश असून, हे प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी निधी पुरविल्यानंतर सहा महिने ते अडीच वर्षांचा कालावधी निर्धारित करण्यात आला होता. कार्यान्वित झालेल्या अशा प्रकल्पांचे निकाल पुढील वर्षापासून दिसू लागतील. यासंबंधी निविदांचे सर्व अधिकार रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.

Web Title: Two thousand km railroad in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.